ठाणे : राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.ठाणे महापालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संत रविदास महाराज जंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही असे शिंदे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. मी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरायचो. अडीच वर्षांत कधीच मला थकवा आला नाही. कारण, लाडक्या भाऊ आणि बहिणींमुळे मला उर्जा मिळायची. आतापर्यंतच्या कधीच इतके निर्णय घेतले गेले नव्हते असेही शिंदे यांनी सांगितले. मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. मला या राज्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली. ही ओळख सर्वात मोठी असल्याचेही ते म्हणाले.

गरीबी काय आहे याची जाणिव आम्हाला आहे. त्यामुळे गरिबांना, सर्वसामान्यांना आपल्या शासनाच्या माध्यमातून काही मदत मिळावी यासाठी आम्ही योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी काही लोक म्हणायचे गरिबी हटाव, पण गरिबी हटली नाही उलट गरिब हटला होता असा टोला त्यांनी नाव न घेता काँग्रेसला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटविली. मोदी यांनी महिलांना आत्मनिर्भर केले आहे असेही शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते. ते पाप धुण्यासाठी मी कुंभमेळ्याला गेलो होतो. हे लोक पाप लपविण्यासाठी लंडनमध्ये जातात असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.आमचे सरकार संवेदनशील आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेऊन नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यापुढे कोणीही आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची हिमंत कोणी करता कामा नये अशा प्रकारचे काम आमचे सरकार करणार आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.