बारवी धरण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहाची स्वच्छता आणि देखभाल करण्याचे कंत्राट मिळालेल्या स्थापत्य कंत्राटदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना एमआयडीसीच्या उप कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. संजय माने असे या लाचखोर अभियंत्याचे नाव असून ते बारवी धरण विभाग अंबरनाथ येथे कार्यरत होते. ७८ हजार रुपये लाचेची त्यांनी मागणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणाचे व्यवस्थापन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पाहिले जाते. यंदा या बारावी धरणाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. बारावी धरण येथे एमआयडीसीचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या स्वच्छता व देखभालीचे कंत्राट एका स्थापत्य कंत्राटदाराला देण्यात आले होते. निवेदनुसार दोन लाख २० हजार ३२६ रुपयांचे बिल कोणत्याही त्रुटीशिवाय मंजूर करण्याकरिता बक्षीस म्हणून तसेच कंत्राटदाराने काम मिळवते वेळी भरलेली अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी बारवी धरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता संजय माने यांनी ७८ हजार लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याची तक्रार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती.

हेही वाचा : ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांकरिता नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली विश्रामगृह

या तक्रारीच्या अनुषंगाने १७ ऑक्टोबर रोजी शासकीय पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी दरम्यान लोकसेवक संजय माने यांनी तक्रारदार यांचेकडे ७८ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्विकारण्याचे कबूल केले. सापळा कारवाई दरम्यान ५० हजार लाचेची रक्कम त्यांच्या कार्यालयात स्विकारताना संजय माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy executive engineer arrested red handed accepting fifty thousand bribebarvi dam badlapur tmb 01