मीरा रोडमधील सृष्टी संकुलात सैनिकांना मानवंदना देणारे स्मारक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन या दोन दिवशी स्वतंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात येत असते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याते येतो. देशभक्तीची ही ज्योत केवळ दोनच दिवसांपुरती मर्यादित न राहता ती आपल्या हृदयात कायमस्वरूपी तेवत राहावी यासाठी मीरारोडच्या सृष्टी परिसरात देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना देणारे एक स्मारक उभारण्यात येत आहे.
मीरा रोडच्या सृष्टी सेक्टर क्रमांक तीन या संकुलात सैन्यदलातून निवृत्त झालेले २१ माजी अधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. याच संकुलात राहणारे आणि देशाच्या अभिमान बाळगणारे हिमेश शहा यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आणि संकुलाच्या फेडरेशनच्या सहकार्याने संकुलात राहणाऱ्या सैन्यदलाच्या माजी अधिकाऱ्यांचा कायम मानसन्मान राखला जाईल यासाठी धडपडत सुरू असते. याही पुढे जाऊन काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. त्यातच मीरारोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांनी अतिरेक्यांशी लढताना काश्मीरमध्ये आपल्या प्राणांचे बलिदान दिल्याची घटना घडली आणि त्यातूनच अमर जवान स्मारक उभारण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. फेडरेशननेदेखील ही संकल्पना उचलून धरली.
येथील रहिवाशांना आणि विशेष करून तरुणांना देशप्रेम, त्याग आणि शिस्त याविषयी कायम प्रेरणा मिळत राहावी यासाठी अमर जवान स्मारक उभारण्यात येत आहे. संकुलातच एक भव्य मैदान आहे. या मैदानात विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या मैदानातच साडेपाच फुटांचे अमर जवान स्मारक उभारण्यात येत आहे. मानवंदना देणाऱ्या सैनिकाची प्रतिकृती सध्या साकारत असून संकुलात स्मारकाचे बांधकामदेखील प्रगतिपथावर आहे.
मैदानात खेळायला येणाऱ्या मुलांच्या आणि तरुणांच्या मनात या स्मारकाच्या माध्यमातून देशप्रेमाचे स्फुल्लिंग कायम तेवत राहावे ही यामागची कल्पना. अशा प्रकारचे स्मारक उभारणारे हे एकमेव संकुल असावे. येत्या १५ जानेवारी या लष्कर दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांच्या बॉम्बे एक्स सव्र्हिसमेन असोसिएशनचे अध्यक्ष कमोडोर बिमन मिस्त्री यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात येणार आहे. मीरा भाईंदरसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, डहाणू आदी ठिकाणच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि जवानांना तसेच वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांना यानिमित्त आमंत्रित करण्यात आले आहे.
साडेपाच फुटांचे स्मारक
सृष्टी संकुलातच एक भव्य मैदान आहे. या मैदानात विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मैदानातच साडेपाच फुटांचे अमर जवान स्मारक उभारण्यात येत आहे. आजवर देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना मानवंदना देणाऱ्या सैनिकाची प्रतिकृती असे या स्मारकाचे स्वरूप आहे. मानवंदना देणाऱ्या सैनिकाची प्रतिकृती सध्या साकारत असून संकुलात स्मारकाचे बांधकामदेखील प्रगतिपथावर आहे.