भाजप बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावले
शिवसेनेशी युती केली तर ती आमच्या अटींवरच होईल, केवळ सत्तेसाठी नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी अनेक मुद्दय़ांवर मतभेद असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन होणार असेल, तरच युती होईल, असे प्रतिपादन करीत फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यसमितीच्या ठाणे येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत स्वबळाचेच संकेत दिले. ‘लढण्याचा आदेश आल्यावर समोर कोण आहे ते न पाहता शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे तुटून पडा, ’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची व कार्यसमितीची बैठक गुरुवारी झाली. शिवसेनेशी युती करू नये, यासाठी भाजप पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांचा दबाव आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे ‘शत प्रतिशत भाजप’ आणि ‘चला जिंकूया महाराष्ट्र सारा’ अशा घोषणांनी सजविलेल्या प्रदेश कार्यसमितीच्या व्यासपीठावरून बोलताना काही नेत्यांनी, शिवसेनेशी युती नको, सत्तेत भागीदारी नको, अशी भाषणे केली आणि त्याला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे युतीच्या मुद्दय़ावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेशी अनेक मुद्दय़ांवर मतभेद असल्याचे स्पष्ट केले. दोन वेगवेगळे पक्ष असल्याने ते साहजिकच असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मात्र तरीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टांसाठी शिवसेनेशी युतीची चर्चा सुरू केली असून आपल्यातील मतभेदांचा फायदा काँग्रेसला होऊ नये, असा त्यामागे उद्देश आहे. मात्र युती केली तर ती केवळ जागांची तडजोड असणार नाही. पारदर्शी कारभार आणि विकासाच्या वाटेने परिवर्तन होणार असेल, तरच युती होईल, असे ठणकावत फडणवीस यांनी भाजपला गृहीत धरू नका, असाच इशाराच सेनेला दिला.
गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने शेती, कृषी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, सिंचन आदी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आणि ओबीसी, मराठा, धनगर आदी समाजघटकांसाठी घेतलेल्या निर्णयांचा विस्तृत आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. भाजपला छत्रपती शिवरायांचा आशिर्वाद असून ‘शिवशाही’ नुसार आम्ही राज्यकारभार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नोटाबंदीविरोधातील प्रचाराला प्रत्युत्तर
नोटाबंदीविरोधातील काँग्रेस व अन्य पक्षांच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. काळ्या पैशांविरोधातील ही लढाई असून त्यातून जे देशाला फायदे होणार आहेत, त्याबाबत जनतेमध्ये जाऊन प्रचार करण्याची मोहीम भाजप कार्यकर्ते हाती घेणार आहेत. नोटाबंदीबाबत पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारा ठराव मांडण्यात येऊन त्याचे समर्थन करण्यात आले आहे.
दलित व मुस्लीम भाजपच्या पाठीशी
विरोधकांकडून भाजपला जातीयवादी ठरविले जात असले तरी हा अपप्रचार असल्याचे स्पष्ट करीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दलित व मुस्लिमांचाही भाजपला पाठिंबा असल्याचे सांगितले. नगरपालिका निवडणुकीत भाजपने घोडदौड केली असून मोठय़ा संख्येने भाजप व मित्रपक्षांचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षांपैकी तीन मुस्लीम व १४ मागासवर्गीय असून हे समाजघटक भाजपच्याच बरोबर असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.