डोंबिवली – भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती डोंबिवली जीमखाना येथे उभारण्यात आली आहे. या प्रतिकृती मंदिरात राम, सिता, लक्ष्मण आणि बजरंगबली हनुमान यांच्या प्रतिमा पूजनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती डोंबिवलीत उभारण्यात आली असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वाडा, भिवंडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे दररोज दर्शनासाठी येत आहेत.

संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शन रांगेत, बालके, त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांची गर्दी असते. डोंबिवलीतील भाजपचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवली जीमखान्याच्या मैदानावर राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…

हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावर भुयारी मार्ग; ठाणे, कल्याण-डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न

२२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज असलेले अयोध्येतील राम मंदिर पाहण्यासाठी प्रत्येक नागरिकाला तत्काळ वेळ नसेल किंवा काहींची इच्छा असूनही ते तेथे जाऊ शकत नाहीत. अशा नागरिकांना आपल्या शहरात अयोध्येतील राम मंदिर कसे आहे, हे पाहता यावे या उद्देशाने या प्रतिकृतीचे उभारणी करण्यात आली आहे.

दर्शन घेतल्यानंतर भाविक विविध कोनातून राम मंदिर प्रतिकृतीच्या मोबाईलमधून प्रतिमा टिपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ६० फूट बाय ४० फूट आकाराची ही प्रतिकृती आहे. अयोध्येतील राम मंदिरातील बारकावे या मंदिरात पाहण्यास मिळतात. प्रतिकृतीच्या भागात खासगी सुरक्षारक्षकांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. ज्येष्ठ कलादिग्दर्शक उदय इंदप, त्यांची कन्या सानिका यांनी या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे कलानिपुण चित्रकार प्रभू कापसे यांनी या प्रतिकृती उभारणीत समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा – शहापूरजवळील डोळखांब आरोग्यकेंद्र ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने, श्रेणीवर्धनामुळे ३० खाटांचे रुग्णालय होणार

प्रतिकृती उभारणीसाठी प्लायवूड, प्लास्टर ऑफ पॅरिस, फब्रिकेशन या साधनांचा वापर करण्यात आला आहे. महेश गावडे यांंनी प्रतिकृतीवर विद्युत रोषणाई केली आहे. जय जय श्रीरामची धून, याठिकाणी भाविकांच्या कानी पडत आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीपर्यंत ही प्रतिकृती डोंबिवलीत भक्तांसाठी खुली राहणार आहे.