ठाणे : ईव्हीएम मतदान यंत्राविरोधात राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलनास सुरूवात केली आहे. ठाण्यातही धर्मराज्य पक्षाने विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत. या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान घेतले जात आहे. तसेच प्रजासत्ताकदिनी रात्री ९ वाजता पाच मिनीटे घरातील किंवा आस्थापनाचे दिवे बंद करून निषेध नोंदविण्याचे आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केले.
हेही वाचा >>> कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
ईव्हीएम यंत्र हटविण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीने विविध माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. धर्मराज्य पक्षाने देखील ईव्हीएम यंत्राविरोधात आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. राजन राजे यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. शहरातील विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहे. या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान घेतले जात आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
प्रजासत्ताक दिनी रात्री ९ वाजता पाच मिनीटे घराचे किंवा आस्थापनाचे दिवे बंद करून निषेध नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. या देशात लोकशाही संपली असून अघोषित आणीबाणी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमच्या पोपटात सत्ताधाऱ्यांचे प्राण दडले असेल तर ईव्हीएमला संपविले पाहिजे असेही ते म्हणाले. निवडणूका सत्ताधाऱ्यांना नको आहेत. लोकभावनेचा त्यांना आदर करायचा नाही. मुठभर भांडवलदारांचे त्यांना वर्चस्व हवे आहे असा आरोपही त्यांनी केला.