डोंबिवली – शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश युवासेना सचिव आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी रविवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. अनेक नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा त्यांचा दावा मात्र फोल ठरला. दीपेश, त्यांचा भाऊ जयेश यांच्या व्यतिरिक्त दोन माजी नगरसेविका त्यांच्या सोबत होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिंदे शिवसेनेतील एकही तगडा नगरसेवक, पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या सोबत गेला नाही. कल्याण पूर्वेतील विधानसभेसाठी निवडणूक लढविणारे काही होतकरू यावेळी ठाकरे पक्षात प्रवेशाची शक्यता होती. त्यांनीही माघार घेतल्याचे चित्र होते. गेल्या महिन्यापासून दीपेश यांनी डोंबिवलीतील १२ हून अधिक नगरसेवक घेऊन ठाकरे पक्षात प्रवेशाची व्यूहरचना आखली होती. भाजप, शिवसेनेसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या होत्या. या सर्वांनी दीपेश यांना समर्थन देण्यास नकार दिल्याचे चित्र रविवारी होते.
हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
डोंबिवलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, ज्येष्ठ नगरसेवक तात्यासाहेब माने, महिला नेत्या वैशाली दरेकर यांसह कोणीही पदाधिकारी दीपेश यांच्यासोबत उपस्थित नव्हता. ठाकरे गटातील निष्ठावान शिवसैनिकांनी यापूर्वीच दीपेश यांच्या पक्षप्रवेशाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांंनी आपल्या पक्षातील एकही नगरसेवक दीपेश सोबत जाऊ नये म्हणून रात्रीपासून संबंधितांवर पाळत ठेवली होती, असे समजते. रविवारी सकाळी १०० हून अधिका वाहनांचा ताफा घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह दीपेश म्हात्रे मातोश्री येथे पोहोचले होते.
लोकसभेतच धडा
तुम्हाला शिवसेनेत काही अनुभव आले म्हणून तुम्ही आता आमच्या सोबत आला आहात. हीच कृती जर तुम्ही अगोदर केली असती तर आपण कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळीच आपली ताकद दाखवून दिली असती. शिवसेनेजवळ सत्ता, पैसा, गुंडाशाही असूनही आपल्या एका भगिनीला चार लाख मते या मतदारसंघात मिळाली. त्यामुळे आपण यापूर्वीच सोबत असता तर मुख्यमंत्री पुत्राला या मतदारसंघात आपण धूळ चारली असती, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
साम, दाम, दंड, भेद वापरून डोंबिवली, कल्याण परिसरात आपण पक्ष वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू. सत्ताधारी पक्षातील असूनही आमच्यावर सत्तेचा वापर करून गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक नगरसेवक ठाकरे पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे दीपेश म्हात्रे म्हणाले.
पाटील युवा जिल्हाध्यक्ष
युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी जितेन पाटील यांची युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी तातडीने नियुक्ती केली. हे पद यापूर्वी दीपेश यांच्याकडे होते. दीपेश म्हात्रे वजनदार नेते होते, पण त्यांच्या जाण्याने शिवसेनेवर कोणताही फरक पडणार नाही, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.