कल्याण – घटस्फोट झाल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या एका ३७ वर्षाच्या महिलेने बुधवारी दुपारी राहत्या घराच्या इमारतीच्या गॅलरीमधून तळ मजल्याला उडी मारून आत्महत्या केली. जमिनीवर जोरात आदळल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेला तातडीने नातेवाईकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : जिल्ह्यात मलेरिया, डेंग्युची साथ; अतिसार, स्वाईन फ्लु आणि लेप्टोचे रुग्ण आढळले

या मुलीचे वयोवृध्द वडील प्रभाकर शेट्टी यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. प्रभाकर यांच्या मुलीचा विवाह झाला होता. नंतर तिचा घटस्फोट झाला होता. ती कल्याणमधील घरी वडिलांबरोबर राहत होती. घटस्फोट झाल्याने मयत महिला सतत मानसिक तणावाखाली होती. बुधवारी दुपारी मयत महिलेने स्वताच्या शयन गृहातील खोलीतून गॅलरीत जाऊन अठराव्या मजल्यावरून जमिनीवर उडी मारली. वरून जोराने पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घडला प्रकार प्रभाकर यांच्या मुलाने वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने रहिवाशांच्या मदतीने जखमी मुलीला रुग्णालयात आणले. तेथे ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आपला कोणावरही संशय नसल्याचे वडील प्रभाकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan zws