ठाणे : ठाणे शहर सुशोभिकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील शासकीय इमारतींसह इतर वास्तुंवर विद्युत रोषणाई केली असून त्यापाठोपाठ ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने दिवाळीनिमीत्ताने शहरातील कोपरी ते ब्रम्हांडपर्यंतच्या मार्गावरील उड्डाण पुलांसह पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई केली आहे. या संघटनेकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त असा उपक्रम राबविण्यात येत असून करोना संसर्गामुळे या उपक्रमामध्ये गेली दोन वर्षे खंड पडला होता. यंदा करोना निर्बंध हटताच संघटनेने विद्युत रोषणाईच्या परंपरेला पुन्हा सुरुवात केली असून या नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे संपुर्ण शहर उजळून निघाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिवाळीनिमित्त शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली होती. या उपक्रमात सहभागी होऊन शहरातील सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्याचे आवाहन त्यांनी एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिक संघटनेला केले होते. त्यास या संघटनेने प्रतिसाद देऊन शहरातील महामार्गावरील उड्डाण पुलांसह काही वास्तुवर विद्युत रोषणाई केली होती. तेव्हापासून दिवाळीनिमित्ताने शहरात विद्युत रोषणाईच्या परंपरेला सुरुवात झाली. परंतु करोना संसर्गामुळे या परंपरेत दोन वर्षांचा खंड पडला. यंदा करोना निर्बंध हटविण्यात आल्यामुळे सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून त्याचबरोबर दिवाळी सणही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे खंड पडलेली विद्युत रोषणाईची परंपरा बांधकाम संघटनेने यंदा पुन्हा सुरु केली आहे.

nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
445 Anganwadis in Shahapur taluka in darkness due to lack of electricity connection
शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
diva vasai trains cancelled
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Kalyan-Dombivli, Kalyan-Dombivli drivers ,
कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई

हेही वाचा : ‘आपलं कसं सगळं…’ एकनाथ शिंदे बोलत असतानाच कोणीतरी म्हणालं ‘बेधडक’, त्यावर ते म्हणाले “आमच्या फटाक्यांचा आवाज…”

शहरातील कोपरी ते ब्रम्हांडपर्यंतच्या मार्गावरील उड्डाण पुलांसह पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेमार्फत शहर सुशोभिकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेच्या तसेच इतर शासकीय इमारती, पादचारी पुल आणि महत्वाच्या वास्तु अशा सर्वांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे या वास्तु आधीच विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या असतानाच, त्यापाठोपाठ बांधकाम व्यावसायिकांनी शहरातील महामार्गवरील उड्डाण पुल आणि पादचारी पुलांवर केलेल्या रोषणाईने संपुर्ण शहर झळालल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : बापरे ! उल्हासनगरमध्ये माथेफिरूने चक्क इमारतीवर सोडले रॉकेट

दिवाळीनिमित्ताने ठाणे महापालिकेच्या मदतीने आमच्या संघटनेने शहरातील कोपरी ते ब्रह्मांड नाक्यापर्यंतच्या उड्डाणपुल आणि पादचारी पुलावर आकर्षित विद्युत रोषणाई केली आहे. सुमारे ८ किमीच्या महामार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत ही रोषणाई असणार आहे. -जितेंद्र मेहता.अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे

Story img Loader