बदलापूर: परदेशातील भारतीय त्या त्या देशात उत्साहाने सण उत्सव साजरे करतात. याच उत्सवांना पारंपरिक साज देण्याचे काम बदलापुरात एक तरुण करत असून यंदाही अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह आखाती देशांमधील दिवाळी बदलापुरच्या पणत्यांनी प्रकाशमान होणार आहे. बदलापुरातील निमेश जनवाड यांनी यंदाही लाखो पणत्या विविध देशात रवाना केल्या आहेत. पणत्यांसह हजारो गणेशमूर्ती आणि इतर सणांचे साहित्यही जनवाड हे परदेशात निर्यात करत असतात.

बदलापुरात एक सर्वसामान्य कुटुंबातील निमेश जनवाड यांनी चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून सर्व भारतीय सणांच्या वस्तूचे निर्मिती करून त्यांची निर्यात करण्याचे काम काही वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले होते. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवासाठी निमेश जनवाड यांनी लहान मोठ्या अशा जवळपास ७० हजारहून अधिक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात विविध देशांमध्ये पाठवल्या. गणेश मूर्तींची निर्यात मार्च महिन्यापासून ते जुलै अखेरपर्यंत केली जाते. या सर्व मूर्ती जलमार्गे विविध देशांत पाठवल्या जातात. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, अबुधाबी, बहरीन, मॉरीशियस, जपान अशा विविध देशांचा समावेश आहे.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक

गणेशोत्सवानंतर नवरात्री, दसरा आणि दिवाळी हे महत्वाचे सण परदेशात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून यंदाही नवरात्री, दसरा आणि दिवाळीकरिता मातीच्या विविध रूपातील वेगवेगळ्या आकाराच्या सुबक पणत्या परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळीही बदलापूरच्या पणत्यांनी प्रकाशमान होणार आहे. या वर्षात बारा ते पंधरा लाख विविध आकारांच्या विविध पणत्यांचे सेट पाठवण्यात आले आहेत.

संपूर्ण निर्मिती, बांधणी बदलापुरात

चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून पणत्यांची निर्मिती स्थानिक महिलांच्या मदतीने केली जाते. त्यामुळे गृहिणींना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. घरोघरी महिलांना पणत्यांचे रंगकाम आणि सजावटीचे काम करण्याकरिता दिले जाते. घरातील सर्व काम आटपून उरलेल्या फावल्या वेळात महिला पण त्यांचे काम करून स्वतःसाठी किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी चांगले उत्पन्न करतात.