विनोद मेमोरिअल वेल्फेअर सोसायटी आणि विजय नगरी अॅनेक्स युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अनाथालयात लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. विनोद मेमोरिअलच्या वार्षिक बालक महोत्सवाच्या अंतर्गत येऊरमधील विवेकानंद बालकआश्रम येथील मुलांसाठी दिवाळी सण साजरा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. मागासलेल्या वर्गातील मुलांचा शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील विकास यासाठी विनोद मेमोरिअल वेल्फेअर सोसायटी ही सामाजिक संस्था कार्यरत आहे.
आश्रमातील ५० मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे, मिठाई, फराळ वाटप करून दोन्ही संघटनांतील प्रतिनिधी व त्यांच्या मुलांनी आश्रमातील मुलांसोबत दिवाळी सण साजरा केला. काही लोकांनी पैसे, मिठाई, फराळ, नवीन कपडे, अशा वस्तू लहान मुलांसाठी देऊन या कार्यक्रमाला मदत केली. एक महिना सुरुवातीपासूनच घोडबंदर परिसरातील रहिवाशांकडून रद्दी वा जुने कपडे जमा करून त्यातून या कार्यक्रमासाठी निधी उभारण्यात आला, असे विनोद मेमोरिअल वेल्फेअर सोसायटीच्या प्रतिनिधींनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा