ठाणे – येऊर येथील एका पाळीव प्राणी देखभाल केंद्रात ठेवलेल्या एका श्वानाला तेथील दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत श्वानाच्या डोळ्याला इजा येऊन तो निकामी झाला आहे. याबाबत श्वानाच्या मालकाने संताप व्यक्त करत थेट पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यानुसार, केंद्र चालक आणि कर्मचारी या चौघांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागात या श्वानाचे मालक राहातात. त्यांना व्यवसायानिमित्त बाहेरगावी जावे लागते. काही दिवसांपूर्वी ते आणि त्यांची पत्नी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे दोन श्वान येऊर येथील एका पाळीव प्राणी देखभाल केंद्रात ठेवले होते. या कालावधीत प्राण्यांची विचारपूस करण्यासाठी ते संस्था चालकांना संपर्क करत, संस्था चालक देखील त्यांना त्यांच्या श्वानाचे चित्रफीत बनवून पाठवत असत. त्यावेळी चित्रफितीत एका श्वानाच्या डोळ्याला जखम झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ संस्था चालकांना संपर्क करुन विचारले, श्वान खेळत असताना त्याला ही जखम झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा मालकाने त्याला रुग्णालयात घेऊण जाण्यास सांगितले.

हेही वाचा – बदलापूर : आठवडी बाजार बंद करा, शहरातील भाजी विक्रेत्यांची पालिकेवर धडक

हेही वाचा – डोंबिवलीतील ५८ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील सात प्रस्ताव नियमानुकूलसाठी नगररचना विभागात दाखल

रुग्णालयातून आणल्यानंतर संस्था चालकांनी श्वानाची चित्रफीत मालकाला पाठवली असता, तेव्हा श्वानाच्या डाव्या डोळ्याला सुज असल्याचे आणि डोळा बाहेर आल्याचे दिसून आले. तात्काळ मालकाने चेंबुर येथील एका प्राण्याच्या रुग्णालयात श्वानाला उपचारासाठी नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी श्वानाचा डोळा तपासला असता, त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची शस्त्रक्रिया करुन डोळा काढावा लागेल. नाहीतर, त्याला इतर आजारांचा सामना करावा लागेल असे सांगितले. त्यानुसार, मालकाच्या सहमतीने या श्वानाचा डोळा शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला. तेव्हा, मालक तात्काळ भारतात परतले. त्यांनी येऊर येथील प्राण्यांच्या संस्थेत जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असताना त्यांना कोणी काही उत्तर दिले नाही. त्यावेळी मालकाला संशय निर्माण झाला. त्यावेळी मालकांनी संस्थेचे सिसिटिव्ही चित्रफीत पाहण्यास मागितली असता. ते देखील देण्यास संस्थेने नकार दिला. परंतु, मालकाने तगादा लावून ससीटीव्ही फुटेज पाहिले असता, त्यांच्या श्वानाला मारहाण केल्याचे दिसून आले. या मारहाणीत श्वानाच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. याबाबत श्वानाच्या मालकाने संताप व्यक्त करत थेट पोलिसात तक्रार दाखल केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog beaten in thane dog eye failure a case has been registered against four ssb