कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या शेवटच्या हद्दीवरील शहापूर तालुक्यातील अती दुर्गम भागातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या हालचाली जिल्हा आरोग्य विभागाने सुरू केल्या आहेत. या संबंधीचा एक प्रस्ताव आरोग्य सेवा मुंबई मंडळाच्या ठाणे विभागाने मुंबईतील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा अभियान संचालक यांना पाठविला आहे.

शासनस्तरावर हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील डोळखांंब भागातील अतिदुर्गम भागातील रहिवाशांना अति महत्वाच्या वैद्यकीय सुविधेसाठी शहापूर येथे उपचारासाठी जाण्याची गरज लागणार नाही. डोळखांब परिसर अहमदनगर जिल्हा आणि अकोले तालुक्याच्या हद्दीवर आहे. या भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवासाठी डोळखांब येथील सहा खाटांच्या आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात या भागातील रुग्णांचे पूर परिस्थितीमुळे सर्वाधिक हाल होतात.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात वर्षभरात सव्वा दोन लाख वाहनांची नोंदणी

डोळखांब भागात ग्रामीण रुग्णालय सुरू करावे म्हणून अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक शासनाकडे मागणी करत होते. माजी आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी डोळखांब भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भागात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले होते. ते कागदावरच राहिले. स्थानिक ग्रामपंचायतीने या मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या सततच्या रेट्यामुळे आरोग्य सेवेचे मुंबई मंडळाचे ठाणे विभाग उपसंचालक डाॅ. अशोक नांदापूरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांंच्या पत्रावरून मुंबईतील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पत्र पाठवून डोळखांब आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून तेथे ३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची मागणी केली आहे.

रहिवाशांचे हाल

डोळखांंब परिसर हा डोंगर, दऱ्या, माळरानाचा भाग आहे. बहुतांशी वर्ग शेतकरी, कष्टकरी वर्गातील आहे. प्रसूती, विंचू, सर्प दंश, टायफाॅईड, अतिसार, मलेरिया बाधित गंभीर रुग्णांना डोळखांब आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सुविधा नसल्याने ४० किलीमोटर अंतरावरील शहापूर येथे रुग्णाला न्यावे लागते. अनेक वेळा वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण वाटेत दगावतो. महिलांची वाटेत प्रसूती होते. पावसाळ्यात गुंडा-वालशेत भागातील पूल पाण्याखाली गेला तर या भागातील जनजीवन ठप्प होते. साकडबाव डोंंगरी भागातील नागरिकांंना रुग्ण सेवेसाठी डोळखांब येथे येणे त्रासदायक ठरते.

आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने स्थानिक डाॅक्टर प्राथमिक उपचार करून शहापूर, ठाणे येथे रुग्णांना पाठवितात. डोळखांब आरोग्य केंद्र परिसराची लोकसंख्या २८ हजार आहे. दुर्गम भाग विकास कायद्याने (पेसा) ग्रामीण रुग्णालयासाठी १५ हजार लोकसंख्येचा निकष आहे. डोळखांब आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्रे आहेत. डोळखांब, टाकीपठार, शेणवे आरोग्य केंद्रांची एकूण लोकसंख्या ८० हजार आहे.

हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावर भुयारी मार्ग; ठाणे, कल्याण-डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न

आरोग्य केंद्र श्रेणीवर्धनाचे अनेक प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांकडे पाठविले आहेत. त्यात डोळखांबचा समावेश आहे की नाही ते पहावे लागेल. – डाॅ. अशोक नांंदापूरकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे.