येत्या तीन-चार दिवसात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा, भोईरवाडी भागात राहत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत रिक्षा वाहतूक सेवा देण्याचा निर्णय लाल बावटा रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परीक्षेच्या काळात विद्यार्थी, पालक तणावामध्ये असतात. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते परीक्षा केंद्रापर्यंत रिक्षेने जाऊ शकत नाहीत. ही तणावाची परिस्थिती विचारात घेऊन लाल बावटा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी आपल्या रिक्षा संघटनेच्या सर्व सदस्यांना परीक्षा काळात विद्यार्थी पालकांना भाडे आकारू नका. विद्यार्थ्यांच्या जवळ भाड्यासाठी पैसे नसतील तर अशा विद्यार्थ्यांना प्रवासासाठी नकार देऊ नका. त्या विद्यार्थ्याचा पत्ता किंवा मोबाईल क्रमांक जवळ घेऊन ठेवा. त्या विद्यार्थ्याला रिक्षाचालकाने मोफत सेवा दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांचे भाडे लालबावटा युनियनच्या कार्यालयातून संबधित रिक्षाचालकाला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील पुरावा दाखविल्यावर पैसे देण्यात येणार आहे, असे अध्यक्ष कोमास्कर यांनी सांगितले.

खंबाळपाडा, भोईरवाडी भागातून देविदास सोनकांबळे हे रिक्षा चालक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्याचे काम करणार आहेत. त्यांच्या रिक्षेचा वाहन क्रमांक एम एच ०५ डीएल ४७६० आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक ८६९३०१८४०६ असा आहे. खंबाळपाडा भोईरवाडी भागातील विद्यार्थ्यांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून घरापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत रिक्षेतून मोफत जाण्याच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी केले आहे.

परीक्षा केंद्रावर जाताना किंवा घरी येताना विद्यार्थी पालकांची काही वस्तू रिक्षेत विसरल्यास रिक्षाचालकाने तातडीने ती वस्तू संबंधित विद्यार्थी व पालकांच्या घरी पोहोच करावी असे आवाहन काळू कोमास्कर यांनी रिक्षाचालकांना केले आहे.