डोंबिवली – पलावा गृहप्रकल्पालगतच्या तळोजा-खोणी रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या रस्त्यावरून यापुढे जायचे की नाही असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ओला उबर चालक, दुचाकी स्वार, खासगी मोटार चालक यांना भामट्यांनी लुटल्याच्या घटना ताज्या असताना बुधवारी सकाळी नऊ वाजता खोणी भागातील एका नागरिकाला दोन भामट्यांनी लुटून त्यांच्या जवळील एक लाखाची सोनसाखळी घेऊन पलायन केले आहे.

भगवान रामा काळोखे (५८, रा. पागऱ्याचापाडा, खोणी, पलावा) असे लुटलेल्या प्रवाशाचे नाव आहे. ३५ वयोगटातील दोन तरुणांनी हा लुटमारीचा प्रकार तळोजा-खोणी रस्त्यावर केला आहे. कल्याण, बदलापूर, डोंबिवली परिसरातील बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक तळोजा-खोणी रस्त्याने पनवेल, नवी मुंबई भागात जातात. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. तरीही या भागात दिवसा, रात्री लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. भगवान काळोखे हे पागऱ्याचापाडा येथील बाजारातून मटण खरेदी करून दुचाकीवरून बुधवारी सकाळी नऊ वाजता घरी येत होते. त्यावेळी त्यांना दुचाकीवरून दोन इसम येत असल्याचे दिसले. त्या इसमांनी काळोखे यांना थांबण्यास सांगितले. त्यांची आणि वाहनाची कागदपत्रे मागण्यास सुरुवात केली. आम्ही पोलीस आहोत. आम्ही वाहनांची तपासणी सुरू केली आहे असे काळोखे यांना सांगितले.

Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीत काँक्रीटच्या रस्त्याला तडे, दोन महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता खराब

दुचाकीवरून फिरताना गळ्यात मौल्यवान ऐवज घालून कधीही फिरायचे नाही असा सल्ला भगवान काळोखे यांना तोतया पोलिसांनी दिला. काळोखे यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी तोतया पोलिसांनी स्वत: काढून ती कागदात गुंडाळली. ती काळोखे यांच्या खिशात ठेवत आहोत, असा अभास तयार केला. त्या बदल्यात तोतया पोलिसांनी स्वत:जवळील कागदात गुंडाळलेले दगड काळोखे यांच्या खिशात ठेवले. पोलिसांनी आपल्या खिशात आपली सोनसाखळी ठेवली आहे असे काळोखे यांना वाटले. दोन्ही भामट्यांनी काळोखे यांना जाण्यास सांगितले व स्वत:ही तेथून निघून गेले.

हेही वाचा – श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता

घरी गेल्यावर काळोखे यांना आपल्या खिशात सोनसाखळी ऐवजी दगड ठेवले असल्याचे दिसले. तात्काळ ते पुन्हा दुचाकीने तळोजा खोणी रस्त्यावर आले. तोपर्यंत दोन्ही तोतया पोलीस पळून गेले होते. याप्रकरणी काळोखे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.