लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- शहराच्या पूर्व, पश्चिमेत मुख्य वर्दळीच्या सर्व रस्त्यांवर गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कमानी विविध राजकीय पक्षांनी रस्त्याच्या दुतर्फा लावल्या आहेत. या कमानींचा रस्ते वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे शहरात दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी दिसू लागली आहे. या सततच्या कोंडीमुळे प्रवासी विशेषता शाळकरी विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना शालेय बस कोंडीत अडकावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
pm Narendra modi loksatta news
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
Pedestrian subway unsafe Demand to appoint security guards Pune news
पिंपरी-चिंचवड: पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!

गेल्या आठवड्यापासून राजकीय मंडळींमध्ये या कमानी लावण्यासाठी स्पर्धा सुरू होती. शेवटी सर्वच राजकीय पक्ष, काही गणेशोत्सव मंडळांनी मोक्याच्या रस्त्यांवर कमानींसाठी जागा मिळविण्यात यश मिळविले. तीन बाय तीन फुटाच्या चौकोनी आकाराच्या या लोखंडी आकाराच्या कमानी वर्दळी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या आहेत. दत्तनगरमध्ये प्रगती महाविद्यालयाकडे जाण्याच्या वर्दळीच्या रस्त्यावर दोन भव्य कमानी वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहेत. या भागात मासळी बाजार, वाहनांची गर्दी, त्यात चार बाय चार आकाराच्या भव्य कमानींचा अडथळा वाहतुकीला येत आहे.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवानांकडून फेरीवाल्यांची तपासणी, महिला डब्याजवळ विशेष तपास पथक

अगोदरच डोंबिवली शहरातील रस्ते संध्याकाळी वाढत्या वाहन संख्येने कोंडीत अडकलेले असतात. त्यात आता कमानी लावण्यात आल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. या कमानी आता दिवाळीपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांसह वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे.

तसेच, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी पाच वाजल्यापासून ढोलताशा पथकांसह डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील जोंधळे हायस्कूल चौकात मंडळाचा गणपती वाजतगाजत नेण्यासाठी जमतात. या मंडळाचा ट्रक, मंडळ कार्यकर्त्यांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे दररोज संध्याकाळी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ वाहन कोंडी होते. वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात असतात. परंतु, चारही बाजूने येणारी वाहने, गणेश मंडळांनी अडविलेला रस्ता यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना कोंडीला सामोरे जावे लागते.

या मंडळांनी सकाळी, दुपारच्या वेळेत गणपती बाप्पा घेऊन जावा. आणि प्रवाशांना त्रास होणार नाही, असे नियोजन करण्याची मागणी अनेक नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस, वाहतूक पोलिसांनी या सूचना सार्वजनिक गणेश मंडळांना करण्याची मागणी काही नागरिक करत आहेत.

Story img Loader