डोंबिवली : रस्त्यामधून चालणाऱ्या दोन जणांना मोटार कार चालकाने भोंगा वाजवून बाजुला होण्याचा इशारा केला. त्याचा राग त्या दोन पादचाऱ्यांना आला. या पादचाऱ्यांनी मोटार कार चालकाने भोंगा वाजविल्याच्या रागातून कार चालकाच्या वाहनाची रात्रीच्या वेळेत तोडफोड केली. त्यानंतरच्या वादातून एका इसमाने मोटार कार चालकाला पिस्तुलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

डोंबिवली पूर्वेतील सागाव येथील रविकिरण सोसायटी चेरानगर भागात हा प्रकार सोमवारी घडला आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. यामधील काही जण सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. कैलास भंडारी, रोशन लोखंडे, शिवम त्रिपाठी, नीतेश गुप्ता, तेजस म्हात्रे, नीर गोपाळ बुटेला, ओमकार मांडरे अशी गुन्हा दाखल तरूणांची नावे आहेत. त्यांच्यावर अग्निशस्त्र प्रतिबंधक आणि हत्यारे कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

man murdered colleague over dispute on food cooking
धक्कादायक! हॉर्न का वाजवता? विचारल्याने दोन बहि‍णींकडून माजी पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Analog Space Mission :
Analog Space Mission : भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन लडाखमध्ये सुरू; इस्रोची ही अंतराळ मोहीम काय आहे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा…डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकाला फेरीवाल्यांचा विळखा, विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी

पोलिसांंनी सांगितले, सोमवारी रात्री तक्रारदार नीलेश भोईर यांचा चुलत भाऊ जनार्दन भोईर आणि त्यांचे कुटुंबीय मोटार कारने सागाव मधील आपल्या घरी परतत होते. भिका म्हात्रे चाळीजवळील रस्त्यावर दोन इसम रस्त्याच्या मध्यभागातून चालले होते. जनार्दन यांनी मोटारीचा भोंगा वाजवून त्यांना बाजुला होण्याची सूचना केली. त्यावेळी दोन्ही इसमांनी जनार्दन यांच्याकडे रागाने बघितले. त्यांच्याशी वाद न घालता जनार्दन घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी भोईर कुटुंबीयांना घरासमोरील मोटारीची कार फोडण्यात आल्याचे दिसले. तक्रारदार नीलेश भोईर वहिनी प्रणाली भोईर यांच्यासह वाहनाची फुटलेली काच बघत असताना तेथे दोन इसम आले. प्रणाली यांनी या दोन इसमांची काच फोडली असावी असा संशय व्यक्त केला. दोन इसमांपैकी एकाने आम्हीच काच फोडली असा दावा केला. एका इसमाने कमरेला असलेले पिस्तुल बाहेर काढून ते नीलेश भोईर यांच्या कानाच्या बाजुला लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भोईर कुटुंबीयांनी ओरडा केल्यावर दोन्ही तरूण पळून गेले.

हेही वाचा…कल्याण-डोंबिवलीत फटाके विक्रीच्या मंचांनी अडविले वर्दळीचे रस्ते, पदपथ

ते सागाव मधील मोरेश्वर पार्क इमारत गेले. भोईर कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग केला पण ते इमारतीमधून पळून गेले. त्यांच्या जवळील पिशवी त्यांनी मोरेश्वर पार्क इमारतीच्या एका कोपऱ्यात ठेऊन दिली होती. ही पिशवी घेण्यासाठी एक तरूण आला. जमावाने त्याला पकडून ठेवले. तातडीने मानपाडा पोलिसांना ही माहिती नीलेश भोईर यांनी दिली. पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पिशवीची तपासणी केली. त्यात पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, तीन लोखंडी चॉपर आढळले. पकडून ठेवलेल्या तरूणाचे नाव नीर बुटेल (रा. १८, रा. नांदिवली) असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. नीर याने पोलिसांनी सांंगितले, जनार्दन भोईर यांनी मोटारीचा भोंगा वाजविला म्हणून कैलास भंडारी, रोशन लोखंडे यांच्यात वाद झाला होता. त्या वादातून आम्ही सर्वांनी मिळून पहाटेच्या वेळेत येऊन जनार्दन भोईर यांच्या मोटारीची काच फोडली होती. नीलेश यांंना पिस्तुलाने धमकाविणाऱ्या तरूणांची नावे शिवम त्रिपाठी, नीतेश गुप्ता असल्याचे पोलीस तपासात उघडकीला आले. सागाव भागातील वाढत्या गुन्ह्यांमुळे या भागातील गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Story img Loader