डोंबिवली : लैंगिक अत्याचार, गुन्हेगारीच्या वाढत्या घटना विचारात घेऊन डोंबिवली जवळील खोणी गावातील ग्रामस्थांनी गावामधील मस्जिदीमध्ये गावातील मुस्लिम समाजा व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या मुस्लिम धर्मियांना नमाजास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीचा निर्णयामुळे खोणी गाव हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे खोणी गाव हद्द परिसरातील मुस्लिम धर्मिय नमाज पठणासाठी खोणी गावाच्या वेशीवर आले. त्यावेळी खोणी ग्रामस्थांनी त्यांना संयमाने वस्तुस्थिती सांगून गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना, कल्याणमध्ये अत्याचारातून झालेली हत्या आणि वाढती गुन्हेगारी विचारात घेऊन गावातील महिला, मुली, लहान बाळांची सुरक्षितता महत्वाची असल्याने खोणी ग्रामस्थांनी बाहेरील मुस्लिम धर्मियांना गावात येण्यास शुक्रवारी प्रतिबंध केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा