डोंबिवली – सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील फ प्रभाग हद्दीतील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली भागाला फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे. दररोज सकाळ, संध्याकाळी फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांकडून फेरीवाल्यांवर देखाव्यापुरती कारवाई करून वरिष्ठांसमोर कारवाईचा देखावा उभा केला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग हद्दीतील राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी, रामनगर, राजाजी रस्ता, शिवमंदिर रस्ता, दत्तनगर भागातील, डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटरहून अधिकच्या भागात एकही फेरीवाला दिसत नाही. मग फ प्रभाग हद्दीतील फेरीवाले कामगारांना का हटविता येत नाहीत, असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत.

हेही वाचा – डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावरील गॅरेजचा वाहतुकीला अडथळा; हातगाड्या, टपऱ्यांनी अडविले चौक

टिटवाळा, कल्याणमधील फेरीवाल्यांचे रेल्वे स्थानक भागातील बस्तान संबंधित प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी गुंडाळले आहे. मग, डोंबिवली पूर्वेतील फ प्रभाग हद्दीतील फेरीवाले का हटत नाहीत, याचा तपास आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नियंत्रक उपायुक्तांनी करावा, अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून जोर धरत आहे. संध्याकाळी चार वाजल्यापासून नेहरू रस्त्यावर ४० हून अधिक पाणीपुरी विक्रेत्यांच्या गाड्या नेहरू रस्त्याच्या छत्रपती शिवाजी उद्यानासमोर दुतर्फा लावल्या जातात. या रस्त्यावर दररोज संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत वाहन कोंडी होते.

फ प्रभागाचे कारवाई पथक फेरीवाल्यांवर कारवाईसाठी आले की फेरीवाले जवळच्या गल्ल्यांमध्ये पळून जातात. या गल्लीमधील रस्ते वाहतुकीसाठी बंद करून टाकतात. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. इतर प्रभागांमध्ये हातगाड्या जागीच तोडून टाकल्या जातात. तसा प्रकार फ प्रभागात केला जात नाही. कारवाई करून पथक गेले की त्यांच्या पाठीमागे फेरीवाले पुन्हा रस्त्यावर येऊन बसतात. कारवाई केल्याची छायाचित्रे वरिष्ठांना पाठवून फक्त कारवाईचा देखावा फ प्रभागाकडून केल्याच्या तक्रारी आहेत.

अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांनी एक दिवस अचानक फ प्रभागातील रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांचा दौरा करावा म्हणजे त्यांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव होईल, असे नागरिकांकडून सांगण्यात आले. फ प्रभागात मुख्यालय मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथकाच्या माध्यमातून दररोज कारवाई सुरू केली तरच हे फेरीवाले हटतील. स्थानिक यंत्रणेकडून हे फेरीवाले हटण्याची शक्यता कमी असल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी दिली.

हेही वाचा – डॉक्टरांनी दिलेल्या श्रवणशक्तीच्या जोरावर डॉक्टर

फ प्रभागात शासन सेवेतील महिला साहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्याची मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून जोर धरत आहेत. डोंबिवलीतील ग, फ प्रभागात शासन सेवेतील महिला साहाय्यक आयुक्तांनी अतिशय शिस्तीने आणि कठोरपणे कामकाज सुरू केले आहे. तशाच पद्धतीने काम करणारी महिला अधिकारी फ प्रभागात नियुक्त करावी, अशा मागण्यांचे निवेदन डोंबिवलीतील जाणत्या नागरिकांकडून आयुक्तांना देण्यात येणार आहे.

फडके रस्ता, चिमणी गल्ली, नेहरू रस्ता, इंदिरा चौक, पाटकर रस्तामधील गल्ली, बाजीप्रभू चौकात रस्ते अडवून फेरीवाले बसत आहेत. फ प्रभागापासून हाकेच्या अंतरावर हा भाग असताना पालिकेला फेरीवाले हटविता येत नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची तक्रार उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेत आहोत, असे कळवले.