डोंबिवली : डोंबिवली विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने आणि महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी कोकण दौऱ्यावर असताना आंगणेवाडी येथे जाऊन भराडी आईचे दर्शन घेतले.
डोंबिवली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मंत्री चव्हाण यांनी भराडी आईचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी राज्यात महायुतीचा विजय व्हावा आणि महायुतीचे सरकार राज्यात स्थापन व्हावे, असे साकडे भराडी आईला घातले होते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी पुन्हा भराडी आईचे दर्शन घेतले. भराडी आईच्या आशीवार्दाने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार पाच वर्ष राज्यात पूर्ण क्षमतेने काम करील, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा : कल्याणमधील सापर्डे गाव परिसरात गूढ हादरा, नागरिक भयभीत
यावेळी मंत्री चव्हाण यांच्या सोबत भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आंगणेवाडी येथील भराडी आई जत्रोत्सवाच्यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कोकणात मुक्काम असतो. या जत्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमात ते दरवर्षी सहभागी होतात.