डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर विस्तारिकरण केलेल्या कल्याण बाजुकडील भागात दर्शक यंत्रणा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. फलाटावर कोणती लोकल येणार आहे याची अचूक माहिती वेळेत मिळत नसल्याने प्रवासी विस्तारित फलाट भागात दर्शक (इंडिकेटर) बसविण्याची मागणी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ आणि १५ डब्याच्या लोकल उभ्या राहता याव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाने हे नियोजन केले आहे. विस्तारित भागात लोकलचे चार डबे थांबतात. या भागात उभ्या असलेल्या प्रवाशांना फलाटावर आता कोणती लोकल येणार आहे याची अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना दिवा बाजुकडे जाऊन दर्शक पाहाव लागतात. अनेक वेळा लोकल फलाटावर येते, परंतु, उद्घोषणा झालेली नसते. अनेक प्रवाशांची लोकल चुकते किंवा लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागते, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेचा खड्ड्यांसाठी टोल फ्री क्रमांक

फलाट क्रमांक चारचे विस्तारिकरण करण्यात आले असले तरी या विस्तारित भागात उतरणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मागे जाऊन जिन्याने, स्कायवाॅकने पूर्व, पश्चिम भागात जावे लागते. डोंबिवली स्थानकात यापूर्वी तीन आणि चार फलाटावर उतरण्यासाठी दिवा-कल्याण बाजुने जीना होता. नव्याने जिन्याची उभारणी करताना रेल्वेने दिवा बाजुकडील जिना बांधला. परंतु, कल्याण बाजूकडील जिन्याची उभारणी केली नाही. त्यामुळे प्रवाशांना दिवा बाजुकडील जिन्याने जावे लागते. फलाटावर विस्तारित भागात सरकता जिना बसविण्याची प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या मागणीची दखल घेण्याची प्रवाशांची मागणी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli railway station does not have a viewer on platform four causing inconvenience to passengers ysh
Show comments