डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक, एक अ वरील दिवा बाजूकडील स्कायवाॅक ते फलाटावर उतरण्यासाठी असणारा जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या आठवड्यात तोडण्यात आला आहे. जिना तोडल्याने प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते.
कोणतीही पूर्वसूचना न देता जिना तोडण्यात आल्याने फलाट क्रमांक एक, एक अ वर येणाऱ्या प्रवाशांची फरफट होत आहे.

डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर, राजाजी रस्ता, आयरे भागातून, डोंबिवली पश्चिमेतून मोठागाव, आनंदनगर, कोपर, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली भागातून येणाऱ्या प्रवाशाला फलाट क्रमांक एक अ वर जाण्यासाठी तोडलेला जिना हा एकमेव मार्ग आहे. र्डोंबिवली पूर्वेतील प्रवाशांना रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर येऊन मग फलाट क्रमांक एक अ वर यावे लागते. अशीच परिस्थिती पश्चिमेतून येणाऱ्या प्रवाशांची आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यतील शहरांपुढे भविष्यातील ‘जलचिंता’

जिना तोडल्याची माहिती नसल्याने अनेक प्रवासी नेहमीप्रमाणे तोडलेल्या जिन्याच्या दिशे जातात. तेथे गेल्यावर त्यांना जिना तोडल्याची माहिती मिळते. त्यामुळे पुन्हा माघारी येऊन प्रवाशांना मधल्या स्कायवाॅकने जाऊन लोकल पकडावी लागते. डोंबिवली लोकल, कल्याणकडे जाणाऱ्या बहुतांशी लोकल फलाट क्रमांक एक, एक अ वरून सुटतात. या लोकल पकडताना आता प्रवाशांची जिना तोडल्याने दमछाक होत आहे.

हेही वाचा – ठाण्यात येऊन आदित्य ठाकरे गेले आव्हाडांच्या भेटीला, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवरील जिन्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळीही प्रवाशांचे हाल होत होते. फलाट क्रमांक एक, एक अ वरील तोडलेल्या जिन्याचे काम लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.