डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील पी ॲन्डी टी काॅलनी वसाहतीमधील सार्वजनिक रस्त्यावर हनुमान मंदिरासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी जाहीर सभा होती. या सभेच्या निमित्ताने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी मानपाडा रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन केले होते. या नियोजनाच्यावेळी काही रिक्षाचालक, मोटारचालक यांनी सागाव साईबाबा मंदिर ते मानपाडा चौकादरम्यान विरुद्ध दिशेने वाहने चालवून मानपाडा रस्त्यावर अर्धा तास कोंडी केली. या विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कोळसेवाडी वाहतूक विभागातील हवालदाराच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात १९ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सभास्थानी योग्यवेळेत वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यावरून जाता यावे म्हणून कोळसेवाडी वाहतूक विभागाने सुयोग्य नियोजन केले होते. काही बेशिस्त वाहन चालकांनी मानपाडा रस्त्यावर साईबाबा मंदिर सागाव ते मानपाडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर विरुद्ध दिशेने वाहने आणून अभूतपूर्व वाहन कोंडी केली. याच मार्गावरून राज ठाकरे सभास्थानी जाणार होते. बेशिस्त वाहन चालकांमुळे मानपाडा रस्त्याची शिळफाटा रस्त्याकडे जाणारी मार्गिका काही वेळ बंद झाली. मालवाहू वाहनांसह इतर प्रवासी या कोंडीत अडकले. ही वाहनकोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची हैराणी झाली. विरुद्ध मार्गिकेतून वाहने चालवून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केला. धोकादायक परिस्थिती या रस्त्यावर निर्माण केली म्हणून वाहतूक विभागाचे हवालदार सुनील उगलमुगले यांच्या तक्रारीवरून बेशिस्त १९ वाहन चालकांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात रस्ते सुरक्षा मानकाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये रिक्षाचालकांसह मोटारचालकांचा समावेश आहे.

resident was brutally beaten up after being asked to remove firecracker stalls from the footpath Dombivli news
डोंबिवलीत पदपथावरील फटाके स्टाॅल काढण्यास सांगितल्याच्या रागातून रहिवाशाला बेदम मारहाण; डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील प्रकार
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
cylinders used by vegetable vendors in dombivli
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील पदपथावर भजी विक्रेत्याकडून सिलिंडरचा वापर
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
thane police
डोंबिवलीतील दोन जण पिस्तुलसह कल्याणमध्ये अटक

हेही वाचा – डोंबिवली चिंचोडीचापाडा येथे सुरा, घेऊन दहशत पसरविणाऱ्या व्यक्तिला अटक

हेही वाचा – डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण

राज ठाकरे वैतागले

शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौकातील मनसेच्या मध्यवर्ति निवडणूक कार्यालयातून राज ठाकरे पी ॲन्डी टी काॅलनीतील सभास्थानी येणार होते. सभेला निघाल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे राज ठाकरे यांना विविध रस्त्यांवरून फिरवून सभास्थानी आणण्यात आले. सभास्थानी निघण्यापूर्वी राज यांना पाच मिनिटांचा रस्ता असल्याचे आयोजकांनी सांगितले होते. आपणास सभास्थानी घुमवून आणल्याचे राज यांनी व्यासपीठावरून सांगताच सभेत हशा पिकला. यापुढची सभा चांंगल्या ठिकाणी घ्या अशी सूचना त्यांनी केली.