डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, मोठागाव भागातील उल्हास खाडीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या बोटी, वाळू उपशाचे पंप, बार्जेस महसूल विभागाच्या डोंबिवली विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नष्ट केले. खाडी किनारी महसूल अधिकाऱ्यांना पाहताच वाळू तस्कर बोटीतून खाडीत उड्या मारून माणकोली गाव बाजुला पोहत पसार झाले.

मुसळधार पावसाच्या काळात अधिक प्रमाणात वाळू खाडीत वाहून येते. त्यामुळे वाळू माफिया या संधीचा फायदा घेत महसूल अधिकाऱ्यांना चकवा देत खाडीत बेकायदा वाळू उपसा करतात. या वाळू माफियांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड आणि सहकारी तलाठी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, मोठागाव भागात गस्त घालत होते.

Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

हेही वाचा…ठाण्यातील वाहतुकीला कोंडीचे ग्रहण

ही गस्त घालत असताना मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांना काही वाळू माफिया कोपरगाव, मोठागाव खाडी हद्दीत बेकायदा वाळू उपसा करत असल्याचे दिसले. गायकवाड यांनी विशेष बोट करून खाडीतील वाळू माफियांपर्यंत जाण्याची तयारी केली. परंतू, काठावरील अधिकारी आपला पाठलाग करून आपणावर कारवाई करतील, या भीतीने रेती उपसा करणाऱ्या बोटीतील मजूर, त्यांचे चालक खाडीला उधाण असताना खाडीत उड्या मारून माणकोली दिशेने पोहत गेले. तेथून खाडी किनाऱ्याला लागून तेथून ते पळून गेले. गायकवाड यांनी या मजुरांना बोटीतच थांबण्याचा इशारा दिला पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. इतर बोटींच्या साहाय्याने महसूल अधिकारी खाडीत गेले. वाळू माफियांच्या बोटी मुख्य बोटीला बांधून त्या ओढत खाडी किनारी आणल्या. विष्णुनगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक गहिनाथ नमे, पोलीस उपनिरीक्षक के. पी. देशमुख घटनास्थळी दाखल झाले. महसूल अधिकाऱ्यांनी कामगारांच्या साहाय्याने गॅस कटरच्या माध्यमातून वाळू माफियांच्या बोटी, बार्जेसना छिद्र पाडून या बोटी खाडीत बुडविल्या. काही बोटींना आगी लावून त्यामधील वाळू उपशाच्या सामानासह त्या जाळून टाकल्या. मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात वाळू उपसा करणाऱ्या अज्ञात इसमांविरुध्द तक्रार केली आहे.

हेही वाचा…Overhead Wire Break: मध्य रेल्वे लोकल सेवा विस्कळीतच, ठाकुर्ली जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याचा परिणाम रात्रीपर्यंत कायम

गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत वाळू माफियांनी ठाणे, भिवंडी, मुंब्रा, डोंबिवली परिसरातील खाडी किनारा वाळू उपसा करून पोखरून टाकला आहे. या भागातील खारफुटी नष्ट करून जैवविविधता या भागातून नष्ट केली आहे. वाळू माफियांना रोखण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची आता डोंबिवली खाडी किनारी भागात नियमित गस्त असते.

हेही वाचा…Overhead Wire Break : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेचा खोळंबा

डोंबिवली खाडीकिनारी भागात वाळू माफियांना रोखण्यासाठी दररोज गस्त घातली जाते. त्यामुळे उपसा करणाऱ्या बोटींची संख्या आता कमी झाली आहे. अनेक वेळा वाळू माफिया उपसा बोटी सोडून खाडीत उड्या मारून पळून जातात. त्यामुळे त्यांना पकडणे अवघड होते. त्यांच्या बोटी मात्र तोडमोड करून खाडीत बुडविल्या जातात. काही बोटी जाळून टाकल्या जातात. – दीपक गायकवाड मंडल अधिकारी, डोंबिवली विभाग.