डोंबिवली – पंडित राम मराठे यांचे शिष्य, गायक सुधीर तथा अविनाश देवधर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झोपेत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. त्या निवृत्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – डोंबिवलीत आयरे गावात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर मोबाईल मनोरा

अविनाश देवधर हे मूळ सातारा येथील निवासी होते. बायर इंडिया कंपनीत ते फार्मासिस्ट म्हणून काम करत होते. संगीत आणि गद्य रंगभूमीवर त्यांनी काम केले होते. राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायक नट म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सफेद चार स्वरामधील गोड गळा, आवाज ही देवधर यांना लाभलेली उत्तम देणगी होती. मास्टर अनंत दामले हे त्यांचे मामा तर अभिनेते प्रशांत दामले त्यांचे आतेभाऊ होते. वडिलांकडून मिळालेला आयुर्वेद रुग्ण सेवेचा वारसा ते पुढे चालवित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील अनेक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.