लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: खच्चून भरलेल्या लोकल गाड्यांमुळे डब्यात चढणे मुश्किल होत असल्याने अनेक तरूण प्रवासी जीव धोक्यात घालून मागील काही दिवसांपासून लोकल नियंत्रणाची सयंत्र असलेल्या बंद डब्या जवळील दरवाजा, पायऱ्यांवर लोंबकळत प्रवास करत आहेत.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

या बंद डब्याच्या दरवाजा जवळ पाय ठेवण्यास अधांतरी जागा असते. एक प्रवासी उभा राहील एवढ्या जागेत तीन ते चार प्रवासी लोंबकळून प्रवास करताना दिसत आहेत. कल्याण ते ठाणे दरम्यान हा प्रकार मागील काही महिन्यांपासून वाढल्या असल्याच्या तक्रारी आहेत.

आणखी वाचा-कळवा स्थानकाजवळ ओव्हरहेड तार तुटली

रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असताना हे प्रवासी रेल्वे मार्गात उड्या मारून जातात कसे, असे प्रश्न प्रवाशांकडून केले जात आहेत. लोकलने वेग घेतल्यानंतर लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बाहेरील हवेच्या दाबामुळे तोल सांभाळणे अवघड जात आहे. कोपर, मुंब्रा, कळवा, दिवा अशा रेल्वे स्थानकांमध्ये नवीन फलाटाची बांधणी केल्यानंतर जिवंत वीज वाहिनीचे सेवा देणारे खांब रूळाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे लो्ंबकळत प्रवास प्रवास करणारा प्रवासी या खांबावर आपटून रूळावर पडून गंभीर जखमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवास करताना कल्याण, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ भागातून येणाऱ्या लोकल अगोदर प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात. यापूर्वीसारखे या डब्यात चढणे सराईत प्रवाशांना अलीकडे शक्य होत नाही. कार्यालयीन वेळ वेळेत गाठण्यासाठी अनेक प्रवासी दरवाजाला लोंंबकळत अधांतरी प्रवास करत असल्याचे समजते.

Story img Loader