डोंबिवली- अनेक वर्षाच्या शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी डोंबिवलीतील एक निवृत्त प्राध्यापक शिवा अय्यर यांनी डोंबिवली ते मंत्रालय पदयात्रा गुरुवारी सकाळपासून सुरूवात केली. १ ऑगस्टपर्यंत प्राध्यापक आणि त्यांची पत्नी मुंबईत पोहचणार आहेत. दररोज पाच किलोमीटर पायी प्रवास करण्याचे नियोजन प्राध्यापकाने केले आहे.

शहरी भागात शाळा सुरू करायची असेल तर पाच गुंठे आणि ग्रामीण भागासाठी एक एकरची शासनाची अट आहे. या अटीमुळे शहरी, ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने शाळा चालविणाऱ्या शिक्षणप्रेमी चालकांची अडचण होत आहे. या शाळा भौगोलिक क्षेत्राच्या अटी पूर्ण करत नसल्याने त्यांच्या शाळा शासनाकडून अनधिकृत म्हणून जाहीर केल्या जातात. या शाळांमध्ये गोरगरीब, गरजू, कष्टकरी समाजातील कुटुंबातील मुले अधिक संख्येने येतात. त्यांचे या निर्णयामुळे नुकसान होते, असे प्रा. शिवा अय्यर यांनी सांगितले.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा >>>डोंबिवलीत बँकेतून बाहेर पडताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

अशा शाळांमध्ये तळागाळातील मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. तो शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अशा उद्देशातून शिक्षण दिले जाते. अशा शाळांमध्ये चालक सामान्य शुल्क आकारुन मुलांना प्रवेश देतो. स्थानिक पातळीवर अशा शाळा शिक्षण प्रसाराचे, ज्ञानदानाचे चांगले काम करतात. या शाळा शासनाच्या भौगोलिक क्षेत्राच्या अटी पूर्ण करत नाहीत, म्हणून या शाळा दरवर्षी अनधिकृत म्हणून घोषित केल्या जातात. स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारचा त्रास अशा शाळा चालकांना दिला जातो. अशा स्वयंस्फूर्तीने चालविण्यात येणाऱ्या शाळांना विनाअट सरसकट सरकारने मान्यता द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले.शासनाकडून आम्हाला आमच्या शाळेला अनुदान द्यावे, अशी आमची मागणी नाही. त्याची अपेक्षा आम्ही करत नाहीत. फक्त ग्रामीण, दुर्गम भागात आम्ही जे ज्ञानदानाचे काम करतो, त्याला शासनाची मान्यता असावी या उद्देशातून, या महत्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ही पदयात्रा करत आहोत, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देणार घरोघरी भेटी, मतदार यादी पुनरिक्षणाअंतर्गत २१ जुलैपासून

डोंबिवली, दिवा, ठाणे, भांडुप, शीव, डाॅ. आंबेडकर चौक ते आझाद मैदान, मंत्रालय असा आमचा प्रवास असणार आहे. १ ऑगस्टपर्यंत आम्ही मुंबईत पोहचू. तेथे आम्हाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी भेट द्यावी. आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे अय्यर यांनी सांगितले. मागील अनेक वर्ष या मागण्यांसाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेण्यात आली नाही म्हणून आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे अय्यर म्हणाले. जोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री भेट देत नाहीत, तोपर्यंत आम्ही मंत्रालयाला प्रदक्षिणा मारणार आहोत, असे अय्यर यांनी सांगितले.मानपाडा पोलिसांना या पदयात्रेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी आम्हाला या गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ठाम आहोत, असे अय्यर म्हणाले.