येत्या दिवाळी सणाचे औचित्य साधून नागरिकांना एकाच ठिकाणी मनपसंतीची वाहन खरेदी आणि कर्ज रक्कम उपलब्ध व्हावी या उद्देशातून डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे डोंबिवली पश्चिमेतील सुभाष छेद रस्त्यावरील भागशाळा मैदानात शनिवार, रविवार (ता. ८ व ९ ऑक्टोबर) वाहन कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे.
हेही वाचा >>>रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोर अटकेत; कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई
सकाळी साडे दहा ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत हे वाहन कर्ज प्रदर्शन खुले राहणार आहे. या वाहन कर्ज मेळाव्यात दुचाकी, चारचाक, इलेक्ट्रिक वाहने प्रदर्शित केली जाणार आहेत. या वाहन प्रदर्शनात नागरिकांनी आपल्या पसंतीच्या वाहनाची नोंदणी केली की पुरवठादार वाहन कंपनीकडून त्यांना वाहन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यानच्या काळात वाहन खेरदी करणाऱ्या नागरिकाला तात्काळ वाहनावर कर्ज घेता यावे म्हणून प्रदर्शन स्थळी डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी वाहन खरेदीदारांना वाहन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी साहाय्य करणार आहेत, असे बँक अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> वेब सीरिज पाहून बँकेतून ३४ कोटी लुटण्याचा मॅनेजरचाच प्रयत्न; डोंबिवलीतील घटना
प्रदर्शन स्थळी वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकाला वाहन खरेदीसाठी १०० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही, असे अधिकारी म्हणाला. वाहन कर्ज मेळाव्यात मारुती, राॅयल एनफिल्ड, टीव्हीएस, हुन्दाई, फोर्स, टोयोटा, बीएमडब्ल्यू, रिनाॅल्ट, महिंद्रा, स्कोड़ा अशा अनेक नामांकित नाममुद्रेची वाहने उभी करण्यात येणार आहेत. वाहन कर्जा बरोबर नागरिकांना बँकेच्या अन्य सेवांची माहिती देण्यात येणार आहे, असे बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले.
डोंबिवली नागरी सहकारी बँक ही देशातील एक अग्रगण्य मल्टी स्टेट शेड्युल्ड सहकारी बँक आहे. बँकेचे कर्जावरील व्याजदार किफायतशीर असून काही प्रकारच्या कर्जांवर प्रक्रिया शुल्कात भरघोस सवलत देण्यात आली आहे, असे सरव्यवस्थापकांनी सांगितले.