लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- डोंबिवली शहराच्या विविध भागात महानगर गॅसकडून घरगुती गॅस पुरवठा करण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एमआयडीसी भागात घरगुती गॅस पुरवठा झाला. आता मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट भागातील भोपर परिसरातील १९८ घरांना महानगरकडून घरगुती गॅस पुरवठा सुरू झाला आहे.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !

भोपर येथील सर्वोदय आनंद सोसायटी संकुलातील १९८ घरांमध्ये बुधवारी सकाळी वाहिनीव्दारे घरगुती गॅस पुरवठा होताच महिला वर्गाने आनंद व्यक्त केला. कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे काही वर्षापासून डोंबिवली शहराच्या विविध भागात महानगर गॅसचा घरगुती गॅस पुरवठा घराघरात सुरू झाला पाहिजे यादृ्ष्टीने प्रयत्नशील आहेत. हा प्रकल्प डोंबिवलीत सुरू होण्यासाठी खा. शिंदे यांनी केंद्र स्तरावर प्रयत्न केले होते. या प्रयत्नामुळे या गॅस प्रकल्पाला येणारे अनेक अडथळे खा. शिंदे यांच्या प्रयत्नाने दूर झाले आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील फेरीवाल्यांचा वाहतुकीला अडथळा

मानपाडा रस्त्याचा काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे बांधकाम विभागाकडून महानगर गॅसच्या भुयारी वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यामध्ये खोदकाम करणे आवश्यक होते. बांधकाम विभागाकडुन ही मंजुरी मिळण्यात अडचणी होत्या. खा. शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क करुन हे काम तातडीने मार्गी लागेल यादृष्टीने हालचाली केल्या. रस्ते खोदकामाची बांधकाम विभागाकडून तात्काळ परवानगी मिळाल्यानंतर विहित वेळेत भोपर परिसरात वाहिनीने गॅस पुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे खासदारांचे कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी भोपर येथील सर्वोदय आनंद सोसायटीला गॅस पुरवठा करणाऱ्या वाहिनीची कळ दाबून गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. यावेळी १९८ घरांमध्ये एकाचवेळी शेगड्या ज्वलनशील झाल्या. महिला वर्गाने घराबाहेर येऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख, तालुका प्रमुख महेश पाटील, युवा सेनेचे सागर जेधे, सोसायटी अध्यक्ष सुरेश चव्हाण, विकास देसले, आकाश देसले उपस्थित होते.

Story img Loader