डोंबिवली– येथील राजाजी पथ भागात राहत असलेल्या एका सोसायटी मधील एका वृध्देच्या घरातील दोन लाख ५० हजाराचा ऐवज चोरीला गेला होता. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासून या घरात काम करत असलेल्या गृहसेविकेनेच ही चोरी केले असल्याचे तपासात उघड केले. या गृहसेविकेला पोलिसांनी अटक केली आहे.

सीमा उर्फ नेहा सदानंद ढोलम (४१) असे गृहसेविकेचे नाव आहे. ती राजाजी पथ भागातील अयप्पा मंदिर परिसरात राहते. पोेलिसांनी सांगितले, राजाजी पथ भागातील एका सोसायटीत छाया साळवी (७०) राहतात. गेल्या शनिवारी त्या पती प्रकाश सोबत डोंबिवलीतील चार रस्ता भागात खरेदीसाठी गेल्या होत्या.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करा, नागरिकांच्या पुढाकाराने पोलीस उपायुक्तांना निवेदन

दरम्यानच्या काळात आरोपी गृहसेविका सीमा हिने बनावट चावीच्या साहाय्याने छाया साळवी यांच्या घराचा दरवाजा उघडून कपाटातील अडीच लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम चोरुन नेली होती. घरी परतल्यावर छाया यांनी कपाट पाहिले तर त्यांना कपाटातील ऐवज गायब असल्याचे दिसले. चोरीची कोणतीही चिन्हे घरात नसताना ऐवज गायब झाल्याने छाया अस्वस्थ होत्या. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी तात्काळ तपासाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. गृहसेविका सीमा छाया यांच्या घरी येऊन गेल्याचे आढळले.

हेही वाचा >>> डोंबिवली : घरडा सर्कल येथील खडीचा रस्ता बांधकाम विभागाकडून साफ

पोलिसांनी सीमाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी सीमाने चोरीची कबुली दिली. सीमाने छाया यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या घराच्या चाव्या ताब्यात घेऊन त्यावरुन नकली चाव्या तयार करुन त्या स्वताकडे ठेवल्या होत्या. सीमाचे पती आजारी आहेत. आजारपणासाठी पैसे लागतात. तसेच सीमाला महागडे कपडे, दागिने घालण्याची आवड आहे. ही हौस पूर्ण करण्यासाठी तिने ही चोरी केली आहे, असे पोलीस तपासात उघडकीला आले आहे. सीमाकडून पोलिसांनी १५ हजाराची रोख रक्कम, २२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १४ ग्रॅम वजनाची अंगठी, दोन बनावट चाव्या जप्त केल्या आहेत.