ठाणे : टक्केवारीतून देवपण नाही येत. देवपण हव असेल तर नागरिकांची समस्या सोडवाव्या लागतात. अशी टिका धर्मराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजन राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ठाणे शहरातुन महाप्रबोधन यात्रेला ठाकरे गटाने सुरुवात केली असून या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवारी जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राजन राजे बोलत होते.
हेही वाचा >>> “…आणि म्हणूनच ही रावणाची औलाद”, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांची शिंदे गटावर टीका
हेही वाचा >>> “…आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळेच मुंबई महाराष्ट्रात” ऋता आव्हाड यांचे विधान
राजन राजे हे कामगार नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजे यांची ठाकरे गटासोबत जवळीक वाढली आहे. त्यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्याची संधी ठाकरे गटाने दिली. त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यात तलावांचे विद्वंस झाले आहे. पर्यावरणाची हाणी झाली आहे. ठाण्यात चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण झाली नाही. मुख्यमंत्री शिंदे दहीहंडी, नवरात्रौत्सवात फिरत आहेत. परंतु टक्केवारीतून किंवा देणग्या देऊन देवपण येत नाही. नागरिकांच्या समस्या सोडवल्यास देवपण येते.
हेही वाचा >>> “काँग्रेसने नाही केलं, ते तुम्ही…”, इंदिरा गांधींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
यावेळी त्यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावरही टिका केली. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी, बोगस आणि अंधश्रद्धा असलेले हिंदुत्त्व असल्याचेही ते म्हणाले. करोना काळात थाळ्या वाजवायला, दिवे पेटवायला लोकांना सांगता. तसेच खऱ्ऱ्या हिंदुत्ववादासाठी आमच्यासोबत चर्चा करा असे आवाहनही त्यांनी भाजपला दिले. करोना काळातील उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.