ठाणे: कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाणे हे मधुमेह आणि वजन कमी करण्याचा मार्ग आहेत, असे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच दिवसातून दोन वेळा खाणे आपले आरोग्य निरोगी ठेवते असे देखील त्यांनी सूचित केले.
ठाणे डायबिटीज रिव्हर्सल कौन्सिलिंग सेंटर यांच्या वतीने स्थूलत्व ब मधुमेह मुक्त विश्व अभियान राबविले जात आहे. जीवनशैली बदलातून वजन कमी आणि मधुमेह मुक्ती या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. तसेच ५५ मिनिटांत खाणे हा देखील चांगला उपाय आहे.
हेही वाचा… कल्याणमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संभाजीनगर मधून अटक
प्रत्येकाने दिवसातून २ वेळा जेवण केल्यास तसेच जेवण ५५ मिनिटांत खाणे गरजेचे आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की दीक्षित डाएटचा अवलंब केल्यास मधुमेह कमी करता येतो. मधुमेहाचे २ प्रकार देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेकदा नागरिकांना मधुमेह आहे हे माहीत नसते. त्याचे प्रकार, मधुमेह वाढ कशाने होते, लठ्ठपणा का येतो या बाबत सविस्तर माहिती त्यांनी नागरिकांना दिली. या कार्यक्रमास सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.