येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळातर्फे देण्यात येणारा पर्यावरणप्रेमी पुरस्कार रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा कर्पे यांना जाहीर झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय दलाल यांनी दिली. श्री गजानन महाराज सेवा मंडळ दर वर्षी एका व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरव करते. शहराजवळील जांभूळ आणि चिखलोली धरणाजवळील जैवशास्त्राचा अभ्यास करून त्यावर मनीषा कर्पे यांनी पीएच.डी. संपादित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देणार असल्याचे अध्यक्ष दलाल यांनी सांगितले. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गजानन महाराज उपासना केंद्रात नॅनो तंत्रज्ञानाचे अभ्यासक डॉ. माहेश्वर शरण व डॉ. माधवी शरण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2015 रोजी प्रकाशित
डॉ. मनीषा कर्पे यांना यंदाचा पर्यावरणप्रेमी पुरस्कार
येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळातर्फे देण्यात येणारा पर्यावरणप्रेमी पुरस्कार रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा कर्पे यांना जाहीर झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय दलाल यांनी दिली.
First published on: 07-02-2015 at 12:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr manisha karpe get environmental lovers award