अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या कोट्यावधी रूपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. अंबरनाथ पश्चिमेला सुरू असलेले क्रीडा संकूल, सर्कस मैदानातील नाट्यगृह आणि शिलाहारकालीन शिव मंदिराच्या परिसर सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी त्यांनी केली. यावेळी क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामावरून संबंधित कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचे निर्देश खासदार शिंदे यांनी दिले. तर क्रीडा संकुल नव्या पद्धतीने बनवण्याचेही त्यांनी यावेळी सूचवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ शहरात विविध प्रकल्प एकाच वेळी सुरू आहेत. कोट्यावधी रूपयांच्या खर्चातून उभे राहिलेले हे प्रकल्प येत्या काळात अंबरनाथ शहराची शोभा वाढवणार आहेत. मात्र त्याचवेळी काही कंत्राटदारांच्या ढिसाळ कारभारामुळे काही प्रकल्प रखडले आहेत. अशा प्रकल्पांची पाहणी शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. यात प्रामुख्याने पश्चिमेतील नेताजी मैदान येथे उभ्या राहत असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामावरून खासदार डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या संकुलासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र क्रंत्राटदारामुळे या प्रकल्पाचे काम रखडल्याचे दिसून आले असून त्या कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी कैलासनगर आणि स्वामी नगर येथील शाळांचीही पाहणी केली. सोबतच लोकार्पणाच्या टप्प्यावर असलेल्या अंबरनाथच्या सर्कस मैदानावरील नाट्यगृहाच्या कामाचीही पाहणी केली.

येत्या १ मे रोजी या नाट्यगृहाचा पडदा उघडेल अशी माहिती डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. शिलाहारकालीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचीही डॉ. शिंदे यांनी पाहणी केली. येथील अनेक वास्तू अंतिम टप्प्यात असून काही वास्तूंचे काम सुरू आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी काही अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली.