ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही सुरक्षा साहित्याविनाच कामगार नाले आणि पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांसोबतच मलवाहिन्यांची सफाई करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाकडे छायाचित्रांच्या पुराव्यानिशी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भिती असते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करते. दरवर्षी एप्रिल महिन्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यंदा महिनाभर उशिराने शहरात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर सर्वत्र टीका होत असून पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे महिनाअखेरपर्यंत नालेसफाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. असे असतानाच आता ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही सुरक्षा साहित्याविनाच कामगार नाले आणि पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांसोबतच मलवाहिन्यांची सफाई करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

हेही वाचा – डोंबिवली, कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर मालवाहू डम्पर चालक भरधाव वेगात

शहरातील नालेसफाई कामांच्या पार्श्वभूमीवर श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी महापालिकेकडे लेखी निवदेन दिले होते. त्यामध्ये किमान वर्षभरासाठी प्रत्येक कामगाराचा वैद्यकीय विमा काढावा तसेच कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची बाब खैरालिया यांनीच उघडकीस आणली आहे. ४ मे रोजी ठाणे पूर्व भागात भुयारी गटारामध्ये कामगारांना उतरवून सफाई करण्यात येत आहे. तसेच ठाणे महापालिका मुख्यालयसमोरील गटारातही कामगारांना उतरवून गाळ बाहेर काढण्यात येत आहे. या सर्व कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साहित्ये दिलेली नव्हती.

हेही वाचा – बनावट पर्यटन कंपनीकडून डोंबिवली, कल्याणमधील महिलांची फसवणूक

कामगारांना केवळ रबरी हात मोजे देण्यात आले होते. सुरक्षा गणवेश देण्यात आलेला नव्हता. शिवाय, बंदिस्त गटारामध्ये विषारी वायू असेल किंवा प्राणवायूचे प्रमाण कमी असेल तर कामगारांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून त्यांना प्राणवायूचे मास्क देणे गरजेचे होते. तेही देण्यात आलेले नव्हते, असा दावा खैरालिया यांनी केला आहे. याबाबत श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असून त्यासोबत दोन्ही ठिकाणचे छायाचित्र पुरावे म्हणून सादर केले आहेत. याप्रकरणी कंत्राटदार व संबंधित पालिका अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.