पंडित जितेंद्र अभिषेक स्मृतिवंदना कार्यक्रम उत्कर्ष मंडळ ठाणे, रघुनाथ फडके व स्व. गजानन कोळी जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमास आय.ए.एस. अधिकारी डॉ. नीला सत्यनारायण, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे योगेश जोशी तसेच कारापूरकर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच योगाचार्य श्रीकृष्ण तथा अण्णा व्यवहारे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन दिनेश अडावदकर व ऋतुजा फडके यांनी केले. त्यानंतर अभंग, नाटय़संगीत मैफलीत रघुनंदन पणशीकर, विक्रांत आजगावकर, नीलाक्षी पेंढारकर, गायत्री जोशी व कार्यक्रमाचे संयोजक व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य रघुनाथ फडके यांनी अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली नाटय़पदे व अभंग सादर करून कार्यक्रमात रंग भरला.
आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदन राजेंद्र पाटणकर यांनी सुरेख निवेदन करून कार्यक्रमात रंगत आणली. सर्वश्री मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक सुभाष वनगे, किशोर तेलवणे, हृषीकेश फडके, गुरुनाथ घरत व सुजय गवांदे यांनी सुंदर साथीने कार्यक्रमाचा दर्जा उंचावला.
सदर कार्यक्रमाला ठाण्यातील ज्येष्ठ कलाकार तसेच संगीतप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वर्षीचा कार्यक्रम ज्येष्ठ गायिका डॉ. सुशीलाराणी पटेल व ज्येष्ठ सरोदवादिका पंडिता झरिन शर्मा यांना समर्पित करण्यात आला. रघुनाथ फडके यांची कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा