ठाण्यातील चिरागनगर येथे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. चंद्रकांत महोतो (२६) असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ११ हजार रुपये किंमतीचा मेथाक्वालोन हा अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
चिरागनगर येथील सेवा रस्त्याजवळ एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या पथकाने चंद्रकांत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्याकडून २२ ग्रॅम वजनाचे मेथाक्वालोन हे अंमली पदार्थ जप्त केले. या अंमली पदार्थांची किंमत १ लाख ११ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.