डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा सिटी भागात मंगळवारी एम. डी. या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या दोनजणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक किमतीची एम. डी. पावडर पोलिसांनी जप्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्शद करार खान (२८, रा. फाऊंटना सोसायटी, पलावा, खोणी, डोंबिवली), शादाबुद्दीन सय्यद (२८, रा. शोर ग्रान, अजमेर, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थांची विक्री करणारे दोन व्यक्ती खोणी जवळील पलावा सिटी भागात येणार आहेत, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना मिळाली होती.

हेही वाचा – सोने मिळाले… पण मालकाचा शोध लागेना, पोलिसांची पंचायत

हेही वाचा – मराठी पाट्यांकडे दुकानदारांची पाठ; मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेचीही सक्ती नाही

मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे, सुनील तारमळे, उपनिरीक्षक भानुदास काटकर यांच्या पथकाने पलावा भागात सापळा लावला. आरोपी आर्शद, शादाबुद्दीन पलावा भागात दुचाकीवरून आले असता, पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून मोटार सायकल, पाच लाखांहून अधिक किमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली. हे अंमली पदार्थ कोठून आणले होते. ते कोठे विकणार होते, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. मुंब्रा, नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात आर्शदवर गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे, असे होनमाने यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drugs seized in palava area near dombivli two people arrested ssb