डोंबिवली : डोंबिवली ते नाहूर दरम्यान लोकलने प्रवास करत असताना गुरुवारी दुपारच्या वेळेत मद्यधुंद अवस्थेतअसलेल्या एका बलवान खासगी सुरक्षा रक्षकाने (बाऊन्सर) लोकलमधील तीन प्रवाशांना किरकोळ कारणावरून दमदाटी करून त्यांना मारण्याची धमकी दिली. तसेच, एका धर्मपंथाच्या भिक्षुकाला जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली. या विविध कारणांवरून एका जागरूक प्रवाशाने संबंधित खासगी सुरक्षा रक्षका विरुध्द डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
तसेच, संबंधित खासगी सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी नोटीस देऊन समज दिली. तक्रारदार हे डोंंबिवलीत राहतात. ते ज्येष्ठ नागरिक आहेत. गुन्हा दाखल बलवान खासगी सुरक्षा रक्षक हे २८ वर्षाचे असून ते लोढा हेवन भागात राहतात. लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीतील माहिती अशी, की तक्रारदार गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली ते नाहूर लोकलने प्रवास करत होते. यावेळी त्याच लोकलमध्ये त्यांचे सहप्रवासी, एका धर्मपंथाचे भिक्षुकही प्रवास करत होते. या लोकलच्या डब्यातून बलवान खासगी सुरक्षा रक्षकही प्रवास करत होता.
हेही वाचा…कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
ग
खासगी सुरक्षा रक्षक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यांनी तक्रारदारासह इतर दोन प्रवाशांबरोबर वाद उकरून काढला. लोकलमध्ये आरडाओरडा सुरू केला. इतर प्रवासी त्याला शांत राहण्याचा सल्ला देत होते. पण सुरक्षा रक्षक ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने तक्रारदारासह त्यांच्या सहप्रवाशाला काहीही कारण नसताना मारण्याची धमकी दिली. तसेच, या लोकलच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एक धर्मपंथाच्या भिक्षुकाला जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली. मद्य सेवन केले असल्याने सुरक्षा रक्षक कोणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. लोकल डब्यात गोंधळ घालून मारण्याची धमकी दिल्याने तक्रारदाराने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन त्याच दिवशी रात्री तक्रार केली.