कल्याण: कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरातील काकडवाल गावात बुधवारी दुपारी दुधकर कुटुंबीयांनी महावितरणच्या वीज चोरी शोध पथकावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत दोन अधिकाऱ्यांचे ओठ फुटले आहेत. दात पडले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

हिललाईन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडवाल गावातील संतोष दुधकर, जगदिश दुधकर, अनंता दुधकर, प्रकाश दुधकर यांनी लोखंडी सळया, लाकडी दांडके, दगडी यांचा वापर करुन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. महावितरणकडून मलंगगड परिसरातील गावांमध्ये १० पथकांच्या माध्यमातून वीज चोरी शोध मोहीम सुरू आहे. बुधवारी सकाळी मलंगगड परिसरात कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या आदेशावरुन साहाय्यक अभियंता योगेश मनोरे, रवींद्र नहिदे, वरिष्ठ तंत्रज्ञ अविनाश महाजन, पुनम पंड्या, मोहिनी राऊत, पुनम वाघाडे, आकाश गिरी, उत्तम पानपाटील हे पथक वीज चोरी शोधासाठी गेले होते.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
akash fundkar loksatta news
मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”

हेही वाचा >>> कल्याणमध्ये आजपासून आगरी-कोळी, मालवणी महोत्सव

मांगरुळ गावातील वीज चोरी प्रकरणांची तपासणी केल्यानंतर पथकाने जवळच्या काकडवाल गावात घराघरात जाऊन वीज चोरी शोध मोहीम सुरू केली. दुधकर कुटुंबीयांच्या चार माळ्याच्या बंगल्याची तपासणी पथकाने सुरू केली. या बंगल्याचे मालक प्रकाश शनिवार दुधकर यांचे वीज देयक पथकाने तपासले. त्यांना वीज वापरापेक्षा वीज देयक खूप कमी असल्याचे आढळले. पथकाने बंगल्याची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी आपल्या बंगल्याची वीज चोरी पकडली जाईल, या भीतीने आरोपी संतोष दुधकर, जगदीश, अनंता, प्रकाश हे घरातून बाहेर आले. त्यांनी बंगल्याच्या आवारातील महावितरणच्या पुरूष, महिला कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करायची नाही तुम्ही बंगल्या निघा असे बोलत मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्लिल शिव्या देत दुधकर बंधूंनी लोखंडी सळ्या, दांडके, दगडींचा वापर करुन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. तुम्ही परत येथे पाय ठेवलात तर तुम्हाला कापून टाकू अशी वक्तव्ये मारहाण करताना दुधकर बंधू करत होते. योगेश मनोरे, आकाश गिरी यांना जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली.

हेही वाचा >>> गुटगुटीत बालके डोंबिवलीतील सुदृढ बालक स्पर्धेत यशस्वी

ही माहिती कार्यकारी अभियंता धवड, उप कार्यकारी अभियंता पद्माकर हटकर यांना मिळताच ते तातडीने काकडवाल गावात आले. मारहाणीचे चित्रीकरण करताना अभियंता नहिदे यांचा मोबाईल आरोपींनी हिसकावला. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली. कार्यकारी अभियंता धवड गावात येऊन त्यांनी पथकाला आरोपींच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुधकर बंधूंनी धवड यांच्या ओठावर ठोसा मारला. त्यांच्या दाताला गंभीर दुखापत झाली आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असताना गावातील एकही ग्रामस्थ आरोपींना बाजुला करण्यासाठी आला नाही. दुधकर कुटुंब पथकावर प्राणघातक हल्ला करण्याचा सतत प्रयत्न करत होते.

हेही वाचा >>> डोंबिवली: वैज्ञानिक शोधांमध्ये पैशापेक्षा गुणवत्ता हेच अधिष्ठान, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे प्रतिपादन

तपासणी पथक नेवाळी पोलीस चौकी येथे पोहचले. त्यावेळी दुधकर कुटुंबीयांमधील एक जण तेथे पहिले हजर होता. पोलिसांसमोर त्या इसमाने पथकाला अश्लिल शिव्या दिल्या. परत या गावात आलात तर ठार मारण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याने रवींद्र नहिदे यांच्या तक्रारीवरुन हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आक्रमक मोहीम

काकडवाल गावात पोलीस बंदोबस्त घेऊन १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन वीज चोरी मोहीम राबविण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केल्या आहेत. काकडवालमधील बहुतांशी घरांमध्ये रात्रीच्या वेळेत खांबांवरील वाहिन्यांवर आकडे टाकून विजेचा वापर केला जातो, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले

तीन वर्षाची शिक्षा

सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिध्द झाला तर आरोपींना तीन वर्षाच्या शिक्षेची तरतुद आहे. यापूर्वी असे गुन्हे सिध्द होऊन आरोपींना तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या आहेत, असे महावितरणच्या एका वरिष्ठाने सांगितले.

Story img Loader