कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात यापूर्वी १५ डब्यांची लोकल ज्या ठिकाणी थांबत होती. त्या ठिकाणावर सोमवार पासून १२ डब्यांची लोकल थांबण्यास सुरूवात झाली आहे. अनेक प्रवाशांना या फेरबदलाची माहिती नसल्याने १२ डब्यात चढताना तीन डबे पुढे जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाण्यात चार ते पाच दिवस पाणी टंचाई, जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे चार दिवस ५० टक्केच पाणी पुरवठा

विशेष करुन महिला आणि प्रथम श्रेणीत चढणाऱ्या प्रवाशांना डबे पुढे गेल्याने धावत पळत जाऊन लोकल पकडावी लागते. या रेल्वे स्थानकांमध्ये यापूर्वी १२ डबा, १५ डबा लोकलचे थांबे स्वतंत्र होते. त्यामुळे प्रवासी लोकल किती डब्याची आहे हे पाहून त्याप्रमाणे डब्यात चढण्याचा निर्णय घेत होते. आता १५ डबा लोकल ज्या थांब्यावर स्थानकात फलाटावर थांबत होती. त्या थांब्यावर १२ डब्याची लोकल सोमवार पासून थांबू लागली आहे. आता स्थानकात तीन डबे पुढे जाऊन १२ डब्याची लोकल थांबू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. नवख्या प्रवाशांना हे जुळून घेताना त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना तर समोर आलेली लोकल सोडून द्यावी लागते, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>>Acid Attack: कल्याणमध्ये मोटारमधून प्रवाशांनी ॲसिड फेकल्याने पादचारी जखमी

या फेरबदलामुळे महिला प्रवाशांचे, प्रथम श्रेणीच्या डब्यांच्या स्थानकात उभे राहण्याच्या रचनेत बदल झाले आहेत. प्रवाशांना आता नवीन जागेत उभे राहून डबा पकडावा लागतो. १५ डबे लोकल यापूर्वी ज्या ठिकाणी उभी राहत होती. तेथे स्थानकांवर अनेक ठिकाणी निवारा नाही. प्रवाशांना उन्हात उभे राहून लोकल पकडावी लागते. किंवा अगोदर सावलीचा आधार घ्यावा लागतो. लोकल स्थानकात येत असताना उन्हात जाऊन लोकल पकडावी लागते, असे महिला प्रवाशांची सांगितले. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार, पाच, सहा, सात, डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चार, पाच वर प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.

पावसाळ्यापूर्वी स्थानकातील ज्या भागात निवारे नाहीत तेथे रेल्वे प्रसासनाने निवारे टाकण्याची कामे पूर्ण करावीत. अन्यथा पावसाळ्यात लोकल पकडताना गोंधळ उडेल, असे प्रवाशांनी सांगितले.

(१२ डबे लोकलच्या नव्या थांब्यामुळे लोकल पकडताना डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तारांबळ.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the new stop of 12 coach local there is a rush of passengers at kalyan dombivli station amy