डोंबिवली: आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहोत. तुमच्या कंपनीत गैरप्रकार सुरू आहेत, असे डोंबिवली एमआयडीसीतील काही उद्योजकांना दाखवून त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तीन तोतया अधिकाऱ्यांविरुध्द उद्योजकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मयंक यशवंत घोसाळकर (३४, रा. लोढा क्राऊन, आर्कीड इमारत, खोणी पलावा) असे अटक करण्यात आलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. मनोज घोसाळकर, समीर चौधरी (रा. गोरेगाव, मुंबई) या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तोतया अधिकाऱ्यांनी उद्योजकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्याची आपली भेटकार्ड दिली. या कार्डवरुन आणि त्यांच्या बोलण्याच्या पध्दतीवरुन ते अधिकारी असल्याचे उद्योजकांना वाटले. या तोतया अधिकाऱ्यांनी पावडर कोटिंग कंपन्यांची यादी तयार करुन त्या कंपन्यांमध्ये प्रवेश केला. तेथील कंपनी चालकांना तुमच्या कंपनीत पावडर कोटिंगच्या नावाने गैरप्रकार सुरू आहेत असे सांगितले. हे तिन्ही आरोपी ज्या कंपनीत गेले तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले होते.

हेही वाचा: कल्याण जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

उद्योजकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात असे कोणी अधिकारी आहेत का याची खात्री केली. तेव्हा अशा नावाचा कोणीही अधिकारी नसल्याचे उद्योजकांना समजले. पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांची भेटकार्ड तपासली. ती बनावट आढळून आली. तोतया अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक केली आहे म्हणून उद्योजक राजेश यादव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. अशाच पध्दतीने इतर उद्योजकांची या तिघांनी फसवणूक केली आहे. मनोज घोसाळकर याला तांत्रिक मााहितीच्या आधारे पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी आतापर्यंत असे किती फसवणुकीचे प्रकार केले आहेत याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dummy officers of pollution bontrol board extorted extortion from entrepreneurs one arrested dombivli tmb 01