डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली भागातील नांदिवली नाला, स्वामी समर्थ मठ ते नांदिवली तलाव रस्त्यावर संध्याकाळच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट उडत असून यामुळे या भागातील रहिवासी, पादचारी, व्यापारी धुळीच्या त्रासाने हैराण आहेत. या भागातील काँक्रीटीकरणाची संथगतीने सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली परिसरातील अनेक भाविक विशेष करुन ज्येष्ठ नागरिक, वृध्द नियमित स्वामी समर्थ मठ येथे दर्शनासाठी येतात. या भागातील रस्ते गेल्या दोन महिन्यापासून काँक्रीटीकरण कामासाठी खोदून ठेवले आहेत. त्यामुळे भाविकांना या भागात दर्शनासाठी येता येत नाही. संध्याकाळच्या वेळेतील कुंद वातावरणात या भागात वाहनांची वर्दळ वाढते. रस्त्यावरील सिमेंट मिश्रित धूळ परिसरात पसरते. धुळीचे लोट या भागात तयार होतात. धुळीच्या सततच्या त्रासाने नांदिवली भागातील रहिवासी खोकला, सर्दी आजाराने त्रस्त आहेत.

हेही वाचा >>> ठाण्यात उद्यापासून ‘पेट फेस्टिव्ह’, पाळीव प्राण्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीरासह श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा

या भागातील डाॅक्टरांनी धुळीच्या त्रासामुळे या भागातील रहिवाशांना विविध प्रकारच्या व्याधी जडल्या आहेत, असे सांगितले. नांदिवली नाला ते नांदिवली तलाव रस्ता सर्वाधिक धुळीने भरला आहे. सर्व प्रकारची वाहतूक या रस्त्यावरुन होते. मानपाडा रस्त्याचे काम सुरू असल्याने काटई शिळफाटा रस्ता दिशेकडील वाहने पी ॲन्डी टी काॅलनी मधील हनुमान मंदिरा समोरील रस्त्याने डोंबिवलीत येतात. काही वाहने स्वामी समर्थ मठाकडे जातात. रस्ते कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dust on the road in nandivali swami samarth math area dombivali citizens trouble ysh