कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रशासकीय कामकाज गतिमानतेने व्हावे म्हणून प्रशासनाने ई ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे झटपट कामे मार्गी लागतील, विकास कामांच्या नस्ती, नागरिकांच्या तक्रारी गतिमानतेने संबंधित अधिकाऱ्यांच्या मंचावर वेळेच पोहोचतील असे नियोजन होते. परंतु, ही प्रणाली तांत्रिक अडचणी, नागरी सुविधा केंद्रातील अपुरे मनुष्यबळ, निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना लावलेले कर्तव्य यामुळे अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेत काही महिन्यांपूर्वी रस्ते बांधकाम नस्ती घोटाळा उघडकीला आल्यानंतर आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रशासनात ई ऑफिस प्रणाली गतिमानतेने राबविण्याच्या सूचना संगणक अधिकाऱ्यांना केल्या. सुरुवातीला पाच विभागांच्या माध्यमातून पथदर्शी प्रकल्प म्हणून ई ऑफिस प्रणाली राबविण्यात आली. या यशस्वीतेनंतर पालिकेतील २५ हून अधिक विभागात ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. हस्त पद्धतीने कोणती नस्ती, तक्रार पालिकेत स्वीकारली जात नाही. मंत्रालयातून आलेले टपालही ई ऑफिस प्रणालीतून आयुक्तांपासून संबंधित विभागाकडे पाठविले जाते.

onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
Supreme Court orders submission of report on Mhada building developers mumbai
पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?

हेही वाचा – ठाणे : नवजात बालकांच्या सुदृढ वाढीसाठी महापालिकेचा मुंबई आयआयटीसोबत उपक्रम

ई ऑफिस प्रणालीमुळे यापूर्वी प्रत्येक विभागात स्वीकारण्यात येणारा नागरिकांच्या नागरी समस्या तक्रारी, इतर तक्रार किंवा अन्य अर्ज आता नागरी सुविधा केंद्रात स्वीकारला जातो. हा अर्ज तेथून स्कॅन करुन संबंधित विभागाला पाठविला जातो. अर्जाची किंवा टपाली पाने अधिक असतील तर तेवढा स्कॅनिंगसाठी वेळ जातो. कागदपत्रे स्कॅनिंग झाल्या शिवाय नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी टपाल ई ऑफिस प्रणालीतून पुढे पाठविण्याची कार्यवाही करत नाही. दररोज ५० हून अधिक तक्रारी नागरी सुविधा केंद्रात दाखल झाल्या तरी त्या कर्मचाऱ्याला स्कॅनिंग करुन मग पुढे पाठवायच्या आहेत. नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर प्रभागात निवडणुकीचे काम दिले आहे. दुपारनंतर नागरी सुविधा केंद्रातील स्कॅनिंग करणारे कर्मचारी ई ऑफिस प्रणालीचे काम सोडून निघून जातात. नागरी सुविधा केंद्रात तक्रारी अर्ज, स्कॅनिंगचे ढीग तयार होतात. वेळेत हे अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या मंचावर पोहोचत नाहीत, अशी माहिती एका माहितगाराने दिली. मंत्रालयातून येणारे टपाल अनेक वेळा ४० ते ५० पानांचे असते. ते स्कॅनिंग करुन वरिष्ठांना पाठवायचे म्हणजे कर्मचाऱ्यांसमोर मोठे दिव्य असते.

हेही वाचा – ठाणे स्थानकाच्या फलाट सात ते दहावरील मुंबई दिशेकडील पादचारी पुल दोन दिवसांपासून बंद

या संथगती कामाकडे सध्या कोणाचे लक्ष नाही. ई ऑफिस प्रणाली गतिमानतेने काम करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात पूर्ण वेळ समर्पित भावाने काम करणारे कर्मचारी, स्कॅनिंग कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे, असे कर्मचारी खासगीत सांगतात. अधिक माहितीसाठी संगणक विभागाचे सिस्टिम ॲनलिस्ट प्रमोद कांबळे यांना संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.