फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकातील व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी मुंब्रा येथील स्थानिक उर्दू दैनिक ‘अवधनामा’च्या संपादिका शिरीन दळवी यांना बुधवारी मुंब्रा पोलिसांनी अटक करून जामीनावर सुटका केली.
१७ जानेवारी रोजी ‘अवधनामा’ दैनिकात ‘शार्ली हेब्दो’मधील व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र त्यास नुसरत अली यांनी आक्षेप घेतला होता. तसेच याप्रकरणी १५ दिवसांपूर्वी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत त्यांनी वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या ‘अवधनामा’ दैनिकावर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी कारवाई झाली नाही, तर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
बुधवारी मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी संपादिका शिरीन दळवी यांना अटक केली आणि त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. दरम्यान न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘शार्ली हेब्दो’तील व्यंगचित्र छापल्याप्रकरणी संपादिकेला अटक
फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकातील व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी मुंब्रा येथील स्थानिक उर्दू दैनिक ‘अवधनामा’च्या संपादिका शिरीन दळवी यांना बुधवारी मुंब्रा पोलिसांनी अटक करून जामीनावर सुटका केली.
First published on: 30-01-2015 at 02:22 IST
TOPICSशार्ली एब्दो
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editor arrested for reprinting cartoon from charlie hebdo