हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
|| भगवान मंडलिक
शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्येच चढाओढ; ‘बालेकिल्ला’ असतानाही दोन निवडणुकांत सेनेचा पराभव;- ठाण्याखालोखाल कल्याण आणि डोंबिवली ही शहरे शिवसेनेची शक्तिस्थळे समजली जातात. मात्र, कल्याण पश्चिम मतदारसंघाने २००९ आणि २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दगा दिला. आता विद्यमान आमदार भाजपचा असल्याने त्या पक्षाचा या मतदारसंघावर दावा आहे. त्यामुळे शिवसेनेतील अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे युती झाली तरी, शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करण्याची शक्यता धूसरच आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र दुर्गाडी पूल, गंधारे, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते टिटवाळा असे पूर्व-पश्चिम दिशेने विस्तारित आहे. कल्याण पश्चिम पालिका प्रभाग क्षेत्र निहाय विचार केला तर या भागात शिवसेना नगरसेवकांची संख्या अधिक आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये हा बालेकिल्ला निसटत्या मतसंख्येने का होईना, ढासळल्याचे दिसून येते. पक्षांतर्गत गटबाजी आणि स्वयंघोषित नेत्यांमधील स्पर्धा यांमुळे शिवसेनेला येथे अपयश आले.
पश्चिम विधानसभा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आला त्यावेळी या पंचक्रोशीत मनसेचे फारसे प्राबल्य नसताना अनपेक्षितपणे नवख्या चेहऱ्याच्या प्रकाश भोईर या मनसेच्या उमेदवाराला साडेपाच हजार मतांच्या आघाडीने मतदारांनी निवडून दिले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना, भाजप, मनसे अशा तिरंगी लढती या क्षेत्रात झाल्या. सेना-भाजपमध्ये तुल्यबळ लढत होऊन महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार नरेंद्र पवार निवडून आले.
युतीच्या राजकारणात हा मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाला जाण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास भाजपपेक्षा कितीतरी अधिक ताकद असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासाठी काम करावे लागेल. पवार यांच्याकडून किरकोळ कामे वगळता प्रभावी कामे झाली नाहीत, अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यात शिवसेनेचे नगरसेवक अनेकदा आघाडीवर असल्याचे दिसते. त्यामुळे युती झाली तरी या दोन पक्षात मनोमीलन किती होईल हा प्रश्न मागे उरतोच. त्यातच आपापल्या पक्षातील इच्छुकांना शांत करताना युतीच्या नेत्यांना घाम फुटणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला येथे आपले आव्हान निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
समस्या जुन्याच
कल्याण पश्चिम हा जुने, नवीन कल्याण अशा भागात विभागले आहे. कल्याण बाजारपेठेचे ठिकाण आहे. याठिकाणी शहरात रस्त्यांवर पादचारी पूल, शिवाजी चौकात उड्डाण पूल, पादचारी पुलांची गरज आहे. प्रशस्त खाडी किनारा लाभूनही तेथे मनोरंजन घाट विकसित करता आला नाही. आधारवाडी कचराभूमीच्या दरुगधीने रहिवासी हैराण आहेत. रिंगरूट, दुर्गाडी पूल, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात कोंडीने कहर केला आहे. हे प्रश्न अनेक वर्षांपूर्वी नाहीच, पण आता भाजपची सर्वदूर सत्ता असतानाही मार्गी लागलेले नाहीत, अशी खंत मतदार नागरिकांना आहे.
मागील पाच वर्षांत नागरिकांना दिलेली बहुतांशी आश्वासने पूर्ण केली. पूरपरिस्थिती, प्रशासकीय विलंबामुळे आधारवाडी कचराभूमी स्थलांतराचा विषय रखडला आहे. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल. नाशिक शहरामधील हायब्रिड रेल्वेच्या पाश्र्वभूमीवर दुर्गाडी ते शहाड हा मार्ग प्रस्तावित केला आहे. वाहन कोंडी सोडवण्यासाठी पादचारी पूल, स्मार्ट सिटी प्रकल्पातील रस्ते, पूल, शहर विकासाची सर्व कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण केली जातील. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे रस्ते बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विकासाची ही कामे घेऊन निवडणुकाला सामोरे जाणार आहे. – नरेंद्र पवार, आमदार, कल्याण पश्चिम
मागील पाच वर्षांतील कामे
- विकासासाठी एकूण २२३ कोटीचा निधी आणला
- गोविंदवाडी रस्त्याचे काम मार्गी लावले
- भिवंडी-कल्याण मेट्रोचे कामासाठी प्रयत्न
- घनकचरा प्रकल्पासाठी ११४ कोटींचा निधी
- दुर्गाडी किल्ला पर्यटन निधीतून विकास
- गौरीपाडा, आधारवाडी तलावांचे सुशोभीकरण
कल्याण परिसरातील शाळा, महाविद्यालयामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या सोयी शहरात उपलब्ध करून द्याव्यात म्हणून कल्याण परिसरात मेडिकल कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज, आयटीआय, स्वयंरोजगार देणाऱ्या संस्था सुरू केल्या पाहिजेत. केवळ गटार, पायवाटा म्हणजे विकास या मानसिकतेमधून आमदारांनी बाहेर यावे आणि सर्वागीण विकासाला प्राधान्य द्यावे. – आकाश बोऱ्हाडे, विद्यार्थी नेता, कल्याण पश्चिम.
मागील आमदाराची कामे पूर्ण केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केला आहे. विकास कामांसाठी २३४ कोटींचा निधी आणला असा दावा आमदार करीत आहेत. हा निधी प्रत्यक्षात कोठे खर्च झाला हे मात्र दिसत नाही. -अतुल फडके, सामाजिक कार्यकर्ते, कल्याण पश्चिम.