ठाणे: भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीला हटविण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी नुकताच मोर्चा काढला असून त्यापाठोपाठ ‘भुमीपुत्रानो आवाज उठवा…आपल्या गावातून टोरंट हटवा’ अशा गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. समाज माध्यमांद्वारे हे गाणे प्रसारित करण्यात येत आहे. यानिमित्ताने टोरंट हटवा मोहिम पुन्हा जोर धरू लागल्याचे चित्र आहे.

टोरंट कपनीच्या माध्यमातून भिवंडी शहरी तसेच ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्यात येतो. या कंपनीविरोधात आता सर्वपक्षीय नेते एकटवले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी टोरंट हटाव कृती समिती स्थानप केली असून त्या माध्यमातून टोरंट कंपनीवर नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. टोरंट कंपनीने एप्रिल २०२३ पासून वीज युनीट दरात वाढ केली आहे. हि दरवाढ करताना ग्राहकांना आक्षेप नोंदविण्याची संधी देणे अपेक्षित होते.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
nana patole Challenge to devendra fadnavis to declare names of active urban Naxal organizations and their leaders in Bharat Jodo campaign
‘भारत जोडोत’ सक्रिय शहरी नक्षल संघटनांची नावे द्या, मुख्यमंत्र्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पत्र
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”

हेही वाचा… पालिका अभियंते, ठेकेदार गायब, डोंबिवली-कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरणीची कामे

पण, तसे कंपनीने केलेले नसून हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तसेच या कंपनीचा मनमानीपणे कारभार सुरू आहे, असा आरोप समितीकडून करण्यात आला होता. टोरंटकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवेप्रती असमाधानी व असंतुष्ट असल्याचे सांगत एमएसईबी, अदानी, टाटा, बेस्ट किंवा इतर वीज वितरक कंपन्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी समितीने केली होती.

हेही वाचा… डोंबिवलीत देवीचापाडा येथे मालवाहतूक रेल्वे मार्गाजवळ बेकायदा इमारत उभारणीचे काम जोमात

या मोर्चानंतर आता टोरंट हटाव मागणीसाठी भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी टोरंट हटाव मागणीसाठी नागरिकांना साद घालणारे गाणे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. ‘गद्दारांचा भरतोय बटवा… भुमीपुत्रानो आवाज उठवा…आपल्या गावातून टोरंट हटवा’ असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यांच्या चित्रफितीत टोरंट कंपनीवर काढलेल्या मोर्चातील छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. या गाण्याचे गायक आणि गीतकार अजय गायकवाड, गायक प्रतिक म्हात्रे, संगीत संयोजक प्रथमेश राणे आणि संकलन योगेश जोशी हे आहेत. गावागावात या गाण्याची चर्चा असून यानिमित्ताने टोरंट हटवा मोहिम पुन्हा जोर धरू लागल्याचे चित्र आहे.

Story img Loader