ठाणे – जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागासह जिल्हा, महापालिका प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविले जात असतानाच, आता जिल्ह्यातील व्यापारी वर्ग देखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. ठाणे तसेच उपनगरातील अनेक व्यापाऱ्यांनी ‘मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा’ अशा आशयाची जाहीरात प्रसारित केल्याचे दिसत आहे. मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतर सलग तीन ते चार दिवस खरेदीवर १० ते २० टक्के पर्यंत सवलती दिल्या जाणार असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोग तसेच स्थानिक प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमा अंतर्गत विधानसभा मतदार संघात ध्वनीक्षेपक, फलक, पथनाट्य अशा विविध माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये सामुहिक संकल्पही करण्यात आला. आता, यापाठोपाठ, जिल्ह्यातील व्यापारी वर्ग देखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ठाणे तसेच उपनगरातील मोबाईल विक्रेते, कपडे विक्रेते, ईलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते अशा अनेक व्यापाऱ्यांनी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ‘मतदान केल्याची शाई दाखवा आणि सवलत मिळवा’ अशा आशयाचा अनेक विक्रेत्यांचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होताना पाहायला मिळत आहे. मतनाच्या दिवशी आणि त्यानंतर पुढील दोन दिवस या सवलतींचा ग्राहकांना लाभ घेता येणार असल्याची माहिती ठाण्यातील एका विक्रेत्याने दिली.
हेही वाचा – सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन ; राज ठाकरे
डोंबिवलीतील एका बड्या व्यापाऱ्याने एक पत्रक प्रसारित केल आहे. त्यामध्ये ‘प्रिय मतदारराजा’ अशी मतदारांना साद घालत, प्रत्येक नागरिकाने मतदान हक्क बजाविणे आपले कर्तव्य आहे. असे म्हणत, जो नागरिक मतदानाचा हक्क बजावेल आणि मतदान केल्याची शाई दाखवेल त्याला ५०० रुपयांच्या आणि त्यावरील खरेदीवर १० टक्के सुट देण्यात येईल असा संदेश लिहिण्यात आला आहे. ही सवलत २० मे ते २३ मे या कालावधीपुरती असणार आहे. हे पत्रक समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. तर, ठाण्यातील बाळकूम पाडा नं – २ येथे असलेल्या मोबाईल दुकानात कोणत्याही वस्तू खरेदीवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत केवळ मतदानाच्या दिवशीच असणार आहे, अशी माहिती विक्रेते कांती चौधरी यांनी दिली. तर, वागळे इस्टेट येथील यशोधन नगर परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानात कपड्याच्या खरेदीवर २० टक्के पर्यंत सवलत देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतर दोन दिवस अशी ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती कपडे विक्रेते राहूल गोळेकर यांनी दिली.