ठाणे : भिवंडीत गोवरमुळे एका आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी भिवंडीत दोनजणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भिवंडीत गोवरमुळे आतापर्यंत तीन बालकांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. भिवंडीत गोवराचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढलेल आहे. येथील इस्लामपूर भागात राहणाऱ्या एका आठ महिन्यांच्या मुलावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यूची माहिती भिवंडी महापालिकेने गुरुवारी दिली. भिवंडीत यापूर्वी एका सहा महिन्यांच्या आणि १४ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भिवंडीत गोवरमुळे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या तीन झाली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-11-2022 at 23:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight month old boy dies bhiwandi due to measles death toll in bhiwandi is three ysh