ठाणे : जगातील सर्वांत उंच आणि कठिणातील कठीण असलेला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) ठाण्यातील आठ वर्षीय गृहिता विचारे या छोट्या हिरकणीने यशस्वीरित्या सर केला आहे. गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहानगी आहे, जिने हे बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केले आहे. तर देशात ती दुसरी आहे. इतक्या लहान वयातील तिच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.
ठाण्यातील घोडबंदर भागात गृहिता ही तिचे आई-वडिल, बहीण आणि आजीसह राहते. तिचे वडिल सचिव यांना गिर्यारोहणाची आवड असल्याने ते मोठ्या गिर्यारोहण गटाबरोबर विविध किल्ले, शिखरावर जातात. यातूनच गृहिता आणि तिची १४ वर्षीय बहीण हरिता यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली होती. व्यायाम, सुरक्षेची साधने वडिलांचे योग्य ते प्रशिक्षण घेत त्यांनी राज्यातील ४० गड-किल्ल्यांवर आतापर्यंत गिर्यारोहण केले होते.
हेही वाचा: ठाणे: अनधिकृत बांधकामाची तक्रार करतो असे सांगून खंडणी मागणारे अटकेत
काही महिन्यांपूर्वीच तिने नऊवार साडी नेसून नवरा-नवरी हा कठीण सुळके सर केले होते. याबद्दल तिला इंडिया बूक ॲाफ रेकाॅर्डने सन्मानित केले होते. त्यानंतर त्यांनी जगातील सर्वात उंच आणि कठिण असलेले माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर गिर्यारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महिनाभर त्यांच्याकडून जिने-चढउतर, शनिवार-रविवारी डोंगर चढ करणे असे व्यायाम सुरू केले होते. आॅक्टोबर महिन्यात हा त्यांनी गिर्यारोहणास सुरूवात केली होती.माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पगाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने आमच्या समोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी, प्राणवायूची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले. अशावेळी भल्याभल्यांना देखील घाम फुटतो, पण काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून गृहिताने ती उंची गाठण्यात यश संपादन केलं. २८ आॅक्टोबरला हे गिर्यारोहण त्यांनी पूर्ण केले.
हेही वाचा: ठाणे: अनधिकृत बांधकामाची तक्रार करतो असे सांगून खंडणी मागणारे अटकेत
१३ दिवसांचे हा गिर्यारोहण १४८ किमीचा आहे आणि लुक्ला Lukla (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंच) ते फाकडिंग Phakding (२६१० मीटर उंच) ते नामचे Namche बाजार (३४४० मीटर) ते टिंगबोचे Tyangboche (३८६० मीटर) ते डिंगबोचे Dingboche (४४१० मीटर) ते लोबुचे Lobuche(४९१० मीटर) ते गोरक्षेप Gorakshep (५१४० मीटर) ते कालापथर Kalapathar (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर). हरिता विचारे तिची मोठी बहीण ही सुद्धा गिर्यारोहणाचा एक भाग होती पण टिंगबोचे (३८६० मीटर) च्या पुढे जाऊ शकली नाही असे गृहिताची आई स्नेहा यांनी सांगितले.